रामनगर मध्ये कोयता गॅंगचा राडा

0
3115

चिंचवड,दि.०८(पीसीबी) – हातात कोयते, लोखंडी रॉड घेऊन आलेल्या पाच जणांच्या टोळक्याने चिंचवड मधील रामनगर परिसरात गोंधळ घातला. वाहनांची तोडफोड करत मोठ-मोठ्याने आरडाओरडा करत एका व्यक्तीला कोयत्याचा धाक दाखवून लुटले. ही घटना शनिवारी (दि. 7) मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली.

नीरज पवार, अभिषेक घुले, अल्पवयीन मुलगा आणि त्याचे दोन ते तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महादू पवार (वय 48, रा. रामनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा आणि त्याचे इतर साथीदार यांनी कोयते, दगड, लोखंडी रॉड घेऊन आरडाओरडा करत रामनगर परिसरात शिवीगाळ करून दगडफेक केली. फिर्यादी महादू पवार यांच्या घरासमोरील गाड्यांची तोडफोड केली. आरडाओरडा करून दहशत निर्माण केली. पवार यांच्या शेजारी राहणारे रामदास दशरथ हराळ यांना पकडून त्यांना कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्या खिशातून दोन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.