रामदेव महाराज यांचे जम्मा जागरण शनिवारी

0
123

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – द्वारकानाथ भगवान श्री रामदेव महारज यांच्या जम्मा जागरण कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. २४ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. प्रख्यात गायक सुशिल गोपलजी बजाज यांच्या सुश्राव्य गायन होणार आहे.
श्री. बाबा रामदेव सोशल ग्रुप पिंपरी चिंचवड, पुणे, सुरत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
भजन सम्राट बॅम्हलिन गोपालजी बजाज यांनी सलग ४० वर्षे जम्मा जागरण केले आहे. आता त्यांचे चिरंजीव सुशिल यांनी तो पारंपरीक भजन गायनाचा वारसा पुढे कायम सुरू ठेवला आहे.


चिंचवड थेरगाव-दत्तनगर येथील मोरया बॅंकवेट हॉल मध्ये दुपारी १२ पासून सुरू होणारा हा सोहळा पहाटे पर्यंत चालणार आहे. लायन्स क्लबचे या कार्यक्रमाला सहकार्य आहे. सर्वांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संजोयकांनी केले आहे.
अनिल लखन, निखील वर्मा, प्रशांत रमेशलाल गुजरानी, सागर हेमंत कोठारी, किशोर नेमिचंद खाबिया, संदेश सुरेस गदिया यांच्यासह अनेक मान्यवरांचा या सोहळ्याच्या आयोजनात पुढाकार आहे.