रामचरित्रातील समरसतेवर आधारित भव्य चित्रकला स्पर्धा

0
155

पिंपरी, दि. १७ (पीसीबी)- २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापणे निमित्त पिंपरी चिंचवड येथील कलारंग सांस्कृतिक कला संस्था व विश्व हिंदू परिषद, पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रभू श्रीराम यांच्या जीवनावर आधारित विविध विषयांना अनुसरून चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

इयत्ता ६ वी ते इयत्ता १२ वी मधील विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून पिंपरी चिंचवड मधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कलारंग संस्थेचे अध्यक्ष श्री. अमित गोरखे, विश्व हिंदू परिषद पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष धनंजय गावडे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक व स्मृती चिन्हांचे वाटप करण्यात येणार असून स्पर्धा दिनांक २० जानेवारी,शनिवार रोजी नाॅव्हेल इंटरनॅशनल स्कूल चिंचवड या ठिकाणी घेण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार असून सर्व स्पर्धकांना प्रवेश विनामूल्य असेल. प्रथम पारितोषिक दिवंगत आमदार कै. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ रोख १५,००० रुपये व स्मृतिचिन्ह, द्वितीय पारितोषिक कै. हिराबाई किसनराव लांडगे यांच्या स्मरणार्थ रूपये १०,००० रुपये व स्मृतिचिन्ह, तृतीय पारितोषिक कै. गणपतराव गोरखे यांच्या स्मरणार्थ रोख ७,५०० रुपये व स्मृतिचिन्ह, चतुर्थ पारितोषिक कै.सुरेश गादिया यांच्या स्मरणार्थ रोख ५,००० रुपये व स्मृतीचिन्ह, कै. सुनंदा यशवंत मिठभाकरे यांच्या स्मरणार्थ रोख २१०० रुपये व स्मृतिचिन्ह ठेवण्यात आले आहे.

१९ जानेवारी दुपारी दोन वाजेपर्यंत नाव नोंदणी सर्वांसाठी खुली राहील स्पर्धेचे विषय व अधिक माहितीसाठी परिपत्रक सोबत जोडत आहोत.

अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी या ९८८१२८००६६/ ९९२१२०२४२१ नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

स्पर्धे संबंधित विषय व अधिक माहिती सोबत जोडत आहोत.
स्पर्धेचे विषय
१)श्रीराम व शबरी भेट २)श्रीराम व केवट भेट ३)नलनील आणि श्रीराम ४)रावण वध
५)आपल्याला आवडणारा रामायणातील
प्रसंग यापैकी कुठल्याही एका विषयावरील चित्र..

दास सहावी ते इयत्ता बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
स्पर्धा शनिवार दिनांक 20 जानेवारी रोजी सकाळी नऊ ते 11 या वेळेत नोबेल इंटरनॅशनल स्कूल च्या ग्राउंड वर होणार आहे.
निवडक चित्रांचे प्रदर्शन लवकरच पिंपरी चिंचवड शहरात भरवण्यात येईल.