रामकृष्ण हरी महिला भजनी मंडळाला प्रथम क्रमांक

0
186

– संतपीठ शाळेमध्ये राज्यस्तरीय पुरुष व महिला, आंतरशालेय भजन स्पर्धा

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका संचलित जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँन्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये दिनांक २८ ते ३० ऑक्टोबर २०२३ या कालावधीमध्ये राज्यस्तरीय पुरुष व महिला (खुला गट) व आंतरशालेय भजन स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले.

शनिवार, २८ ऑक्टोबर २०२३ रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त, प्रशासक तथा संतपीठाचे अध्यक्ष माननीय शेखर सिंह, संतपीठाचे संचालक ह.भ.प. राजू महाराज ढोरे व संचालिका डॉ. स्वाती मुळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. माननीय आयुक्त शेखर सिंह यांनी मार्गदर्शनापर भाषणामध्ये या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करताना ही भजन स्पर्धा नसून कलेची स्पर्धा असावी, असे मत व्यक्त करत असताना संतपीठाच्या माध्यमातून पुढील ५ वर्षात ही भारतातील सर्वात मोठी भजन स्पर्धा असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्पर्धेच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून सचिन भैय्या लांडगे, अॅड.विजय जगताप,, माजी नगरसेवक श्रीमती स्विनल म्हेत्रे, मुजुमदार,तसेच संतपीठ चिंतन समिती सदस्य उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी विविध भागातून ३८ महिला भजनी मंडळे, १८ पुरुष भजनी मंडळे व १३ शालेय संघ सहभागी झाले.सदर स्पर्धेसाठी पुरुष व महिला गटांसाठी पं. बाळासाहेब वायकर व श्रीम. ज्योती गोराणे तर शालेय गटासाठी श्री. लतेश पिंपळघरे, श्रीम. अंकिता तांबे, श्रीम. प्राची पांचाळ पर्यवेक्षक म्हणून लाभले.

विजेत्या भजन स्पर्धक संघांची नावे पुढीलप्रमाणे:

खुला गट महिला-

प्रथम – रामकृष्ण हरी महिला भजनी मंडळ (आल्हाट वस्ती, मोशी), द्वितीय- ताजुबाई महिला भजनी मंडळ (ताजे मावळ) तृतीय- श्रुती संगीत भजनी मंडळ (मंचर), उत्तेजनार्थ- जय गणेश महिला भजनी मंडळ (रावेत)

उत्कृष्ट हार्मोनियम वादक – श्रीम.शैला सुरेश तापकीर ( कुदळवाडी, चिंचवड)

उत्कृष्ट तबला वादक – श्रीम. सीता युवराज सोमवंशी (पूर्णानगर, चिंचवड), उत्कृष्ट पखवाज वादक – श्रीम. तेजस्विनी सुभाषराव देशपांडे (बगवस्ती, चिखली), उत्कृष्ट गायिका- श्रीम. प्रज्ञा अनिल शिंदे (कृष्णानगर, चिखली)
शिस्तबद्ध संघ- नारायणी महिला भजनी मंडळ (राजेशिवाजीनगर)

खुला गट पुरुष-

प्रथम- स्वरगंधार संगीत भजनी मंडळ (पार्थ हौसिंग सोसायटी, शाहूनगर, चिंचवड), द्वितीय- माऊली संगीत भजनी मंडळ (घरकुल, चिखली), तृतीय- स्वरानंद भजनी मंडळ (केळगाव, आळंदी), उत्तेजनार्थ- स्वरायण मुझ्यिक ग्रुप (जुनी सांगवी), उत्कृष्ट हार्मोनियम वादक- श्री. बळीराम रामभाव चव्हाण (जुनी सांगवी)

उत्कृष्ट तबला वादक- श्री. प्रणव फुलचंद घोडे (चऱ्होली), उत्कृष्ट पखवाज वादक- श्री. अंगद सुदाम होडशीळ (आळंदी), उत्कृष्ट गायक- श्री. ओंकार शंकर लोहार (गंज गोलाई,लातूर )
शिस्तबद्ध संघ- उद्धालिक पुरुष भजनी मंडळ (उद्गीर, लातूर)

आंतरशालेय भजन स्पर्धा निकाल :

प्रथम- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल – (लांडेवाडी), द्वितीय- प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल- (आकुर्डी)

तृतीय– पोदार ब्लॉसम स्कूल – (चाकण), उत्तेजनार्थ- राजा शिव छत्रपती हायस्कूल (तळवडे)

उत्कृष्ठ तबला वादक- जिल्हा परिषद, कु. ज्ञानेश गायकवाड (वाबळेवाडी)

उत्कृष्ठ पखावज वादक- श्री ज्ञानेश्वर विद्यालय ज्युनिअर कॉलेज ग्रुप- 3 कु. प्रमोद माळवदकर

(आळंदी देवाची), उत्कृष्ठ हार्मोनियम वादक– जिल्हा परीषद स्कुल, कु. यश नरवडे (वाबळेवाडी)

उत्कृष्ठ गायक- न्यु इंग्लीश मिडीयम स्कूल, कु. विरा नितेश कोकणे (लांडेवाडी, भोसरी), शिस्तबद्ध संघ- न्यु ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल (रांजणी)

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व बक्षीस वितरण करून गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी संत ज्ञानेश्वर भजन मंडळ शेटेवाडी, मावळ तालुक्यातील उत्कृष्ठ गायिका सौ.आशाताई नंदकुमार शेटे महाराष्ट्र भजन कलागौरव पुरस्कृत भजन सम्राट श्री नंदकुमार शेटे महाराज, उत्कृष्ठ गायक दत्तात्रय ढोरे महाराज यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतपीठ अभ्यासक समिती सदस्य श्री. ज्ञानेश्र्वर गाडगे, शाळेचे संस्कृत विषयाचे अध्यापक श्री. सखाराम पितळे व अध्यापिका श्रीम. धनश्री पाटील यांनी केले. संतपीठ शाळेच्या प्रभारी मुख्यध्यापिका श्रीम. स्नेहल पगार यांनी आभार प्रदर्शन केले व पसायदानाने सदर स्पर्धेची सांगता करण्यात आली