राणांकडून दिलगिरी व्यक्त, पण आता बच्चू कडू म्हणतात…

0
211

मुंबई,दि.३१(पीसीबी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी यांनी आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्या वादात मध्यस्थी केली. यानंतर रवी राणा यांनी ५० खोके आणि गुवाहाटी दौऱ्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून शब्द मागे घेतले. तसंच रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली. पण आता बच्चू कडू यांचा वेगळाच सूर असल्याचे दिसून आले. वादावर स्पष्टपणे न बोलता बच्चू कडू हे आता आपली भूमिका कार्यर्त्यांच्या मेळाव्यातून जाहीर करणार आहेत.

रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर बच्चू कडूही वादावर पडदा टाकतील अशी अपेक्षा होती. मात्र बच्चू कडू यांनी रवी राणांवर केलेल्या टीकेवरून आपले शब्द मागे घेतले नाहीत आणि वाद मिटल्याचंही स्पष्ट केलं नाही. आपण आज कार्यकर्त्यांशी चर्चा आणि उद्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून भूमिका जाही करू, असं बच्चू कडू म्हणाले. यामुळे बच्चू कडू आता काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हे प्रकरण चांगल्या प्रकारे हाताळं. मी त्यांचे आभार मानतो. पण आपल्या कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत. त्यांच्यासोबत आज संध्याकाळी ६ वाजता बैठक घेणार आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून नंतर पुढील निर्णय घेणार आहे, असं बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधना स्पष्ट केलं. याशिवाय कार्यकर्त्यांचा उद्या दुपारी १२ ते वाजता कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला संपूर्ण राज्यातून कार्यकर्ते येणार आहेत. या मेळाव्यात आपण आपली पुढील भूमिका जाहीर करू, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.