राज ठाकरे यांनी स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगतापांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

0
266

चिंचवड, दि. ०८ (पीसीबी) – भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं नुकतंच दुर्धर आजाराने निधन झालं. जगताप यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यानंतर सर्व पक्षीय नेते जगताप यांच्या चंद्ररंग निवस्थानी येऊन कुटुंबीयांची भेट घेत आहेत. आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जगताप कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

स्वर्गीय लक्ष्मण जगताप आणि राज ठाकरे यांचे चांगले राजकीय संबंध होते. २०१४ ला झालेल्या लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान राज ठाकरे यांनी पिंपरी- चिंचवड शहरातील मैदानात लक्ष्मण जगताप यांच्यासाठी जाहीर सभा घेतली होती.

२०१४ ला झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत लक्ष्मण जगताप हे शेकाप आणि मनसेचा पाठिंबा घेऊन लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. तेव्हा, राज ठाकरे यांनी पिंपरी- चिंचवड शहरातील मैदानात लक्ष्मण जगताप यांच्यासाठी जाहीर सभा घेतली होती. मात्र, त्या खासदारकीच्या निवडणूकीत लक्ष्मण जगताप यांचा पराभव झाला होता. आज राज ठाकरे हे जगताप यांच्या निवासस्थानी दाखल झाले. लक्ष्मण जगताप यांना आदरांजली वाहून त्यांनी जगताप कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास त्यांनी नकार दिला.