-माथाडी कामगारांनी मनसे कार्यकर्त्यांना पळून पळून मारले
मुंबई, दि. १० (पीसीबी) – मनसेचे माथाडी कामगार सेना नेते महेश जाधव यांनी अमित ठाकरेंवर गंभीर आरोप केला. अमित ठाकरेंनी मला घरी बोलावून मला बेदम माराहण करत मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप जाधव यांनी केला. अमित आणि राज ठाकरे खंडणीखोर आहेत, ते केवळ दलाली गोळा करतात, अशा शब्दांत जाधव यांनी आरोप केले आहेत. मनसे माथाडी सेनेच्या बैठकीत मतभेद झाले, आणि त्यामुळे अमित ठाकरेंना राग आल्यानं त्यांनी मारहाण केल्याचा दावा जाधवांनी केला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मात्र या आरोपांचं खंडन केलंय. बैठकीत जाधवांनी अमित ठाकरेंचा अपमान केल्यानं अन्य कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली, असा प्रतिदावा देशपांडे यांनी केला आहे. जाधवांवर सध्या खारघरच्या मेडीकव्हर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णालयाबाहेर देखील मनसे कार्यकर्ते आणि जाधव समर्थकांमध्ये राडा झाला. माथाडी कामगारांनी मनसे कार्यकर्त्यांना अक्षरशः पळवून पळवून मारल्याचं दिसून आलं.