राज ठाकरेंसह १० जणांविरोधात अजामीनपात्र वॉरंट

0
363
Maharashtra Navnirman Sena (MNS) chief Raj Thackeray was on 12th Feb 2014 , released by Mumbai Police, barley two hours after he was detained in connection with his 'raasta roko' agitation against toll plazas in the state,Raj was detained by the Mumbai Police as thousands of his workers protested against the collection of tax at toll plazas in the state.

सांगली, दि. ९ (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधात सांगलीमधील शिराळा कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट काढलं आहे. राज ठाकरेंना ११ जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. वारंवार गैरहजर राहिल्याने शिराळा न्यायदंडाधिकाऱ्यांनी २८ एप्रिल २००२ रोजी राज ठाकरे यांच्यासह १० जणांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. याप्रकरणी ८ जूनला सुनावणी झाली असता राज ठाकरे गैरहजर राहिले. यानंतर कोर्टाने राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढलं आहे.

शिराळा कोर्टाने २००८ मध्ये राज ठाकरेंच्या अटकेनंतर झालेल्या आंदोलनप्रकरणी एप्रिल महिन्यात वॉरंट काढलं होतं. पण राज ठाकरेंना करोनाची लागण झाली असल्याने बुधवारी झालेल्या सुनावणीला गैरहजर राहिले. मनसेचे नेते शिरीष पारकर या सुनावणीसाठी उपस्थित होते. त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला. पण राज ठाकरे गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात पुन्हा एकदा अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आलं आहे.
२००८ मध्ये रेल्वे भरतीत स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्या या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनात कल्याण कोर्टाच्या आदेशाने राज ठाकरेवर अटकेची कारवाई झाली होती. या अटकेच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी गावात मनसे कार्यकर्त्यांनी बंद पुकारला आणि जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास दुकानदारांना भाग पाडलं होतं.

विनापरवाना बंद पुकारल्यामुळे शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शिराळा प्रथमवर्ग न्यायालयात राज ठाकरे यांच्यासह १० मनसे कार्यकर्त्यांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.