निश्चितपणे राज्य चांगल्या पद्धतीने चालवण्याचे आमचा प्रयत्न आहे. शिवाय राज्य चांगल्या पद्धतीने चालवत असताना सर्वांची मदत घेऊन, सर्वांना विश्वासात घेऊनच राज्य पुढं नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण मी ऐकू शकलो नाही. मात्र जेवढं मी ऐकलं त्यात ते काही महत्त्वपूर्ण मुद्दे बोलले आहेत. निश्चितच आम्ही त्यावर विचार करू. शेवटी राज्य चालवत असताना सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे आमचे उदिष्ट असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
महाराष्ट्राचे प्रश्न सोडवणार असतील मराठी माणसाच्या चांगल्यासाठी काम करणार असतील तर फडणवीसंना पाठिंबा असेल असं राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यातून जाहीर केलं होतं. दरम्यान राज ठाकरेंच्या या आवाहनाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकप्रकारे टाळी देत, मनसे प्रमुखांच्या मुद्द्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे नागपूर येथे बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्यावर भाष्य केलंय.