राज- उध्दव काकांनी एकत्र येण्याची ही योग्य वेळ – जयदीप ठाकरे

0
250

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यात सध्याची परिस्थिती बघता पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे अशी चर्चा पुन्हा एकाद रंगू लागली आहे. या सर्वामध्ये बाळासाहेबांचा नातू जयदीप ठाकरे यांनी महत्त्वाचं विधान करत एका इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या या विधानानंतर अनेक तर्क वितर्क व्यक्त केले जात आहेत.

राज्यातील सध्या उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीत ठाकरे परिवारातील इतर ठाकरे सदस्यांनी एकत्र आलं पाहिजे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ठाकरे परिवारातील इतर सदस्यांनी इतर ठाकरेंनी एकत्र आलंच पाहिजे असे विधान केले आहे. नुकतेच जयदेव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याला उपस्थिती दर्शवली होती. त्यामुळे अनेक अर्थ लावले जात होते.

त्यानंतर आता जयदीप ठाकरेंनी इतर ठाकरे सदस्यांनी एकत्र आलेच पाहिजे असे विधान केले आहे. यावेळी त्यांनी नवं चिन्हं आणि नावाबाबत शिंदे गटावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, शिंदे गटाला जरी बाळासाहेबांची शिवसेना असं नाव मिळालं असलं, तरी रक्त आमच्याकडे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.