राज्य पातळीवरील नृत्य स्पर्धेत नृत्य कला मंदिर ला समूह नृत्यात प्रथम क्रमांक

0
289

दि २९ एप्रिल (पीसीबी ) – जागतिक नृत्य दिनानिमित्त नृत्य कला मंदिर या संस्थेमार्फत घेतल्या गेलेल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत निगडी येथील नृत्य कला मंदिरच्या विद्यार्थिनींच्या समूह नृत्याला प्रथम क्रमांक मिळाला. या स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे देत आहे

सोलो-ऋतुजा गोखले
डुएट-सानिका आणि ऋतिकादि

  लोकनृत्य स्पर्धा

पाच ते बारा वयोगट सोलो-सायली सांगवे
समूह नृत्य-विस्टनर
13 ते 20 वयोगट-

सोलो-हिमानी पुराणिक
समूह नृत्य-एस डी ए ग्रुप
21 ते 40 या वयोगटा

सोलो -स्वाती बालवीर
Duet -समृद्धी भोसले

 बॉलीवूड नृत्य प्रकार

  पाच ते बारा वयोगट-वंशिका

समूह नृत्यात-सूर्यनमस्कार ग्रुप
13 ते 20 वयोगट. -सिद्धिविनायक व रोहित समूह नृत्य-DwN ग्रुप
सोलो-तन्मय सावळे

यावेळी तेजश्री adige, बी एल जोशी, अनिकेत काळोखे, नंदकुमार काळोखे, व बॉलीवूडचे नृत्य दिग्दर्शक श्री जिवेंद्र गुजराती हे मान्यवर उपस्थित होते.

सौ adige, श्री जोशी व श्री गुजराती यांनी मनोगत व्यक्त केले

सौ तेजश्री adige म्हणाल्या, जो वेळ पाळतो तो यशस्वी होतो. कलाकारांना व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. प्रत्येक नृत्याचे वेगळे वैशिष्ट्य असते. त्याच्या आधारे जन्म मजेत घालवा. गावागावात लोकनृत्य जायला हवे.

त्या पुढे म्हणाल्या की मी एक नृत्य गुरु असूनही दुसऱ्या नृत्य गुरूला पुरस्कार देते. यासाठी जिगर लागते. आत्तापर्यंत मी बारा हजार विद्यार्थ्यांना नृत्य शिकवले आहे.
श्री गुजराथी म्हणाले, अशा प्रकारच्या स्पर्धांमधूनच पुढे मोठे कलाकार घडत असतात. तुम्ही हे करियर म्हणून गांभीर्याने घ्या. तुमच्याकडे बुद्धी व कौशल्य असेल तर तुम्ही जग जिंकू शकता

लायन्स इंटरनॅशनल, महाराष्ट्र एकता अभियान, बी द चेंज व प्रतिभा कॉलेज यांच्या सहकार्याने या स्पर्धा पार पडल्या

वैष्णवी शर्मा यांनी सूत्रसंचालन केले