राज्यात 288 आमदार पदासाठी तब्बल ‘इतके’ अर्ज दाखल

0
95

मुंबई, दि. 30 (पीसीबी) : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरु आहे. अशातच आत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत देखील संपली आहे. यादरम्यान राज्यातील अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी, महायुती, वंचित बहुजन आघाडी, मनसे यांसह अपक्ष देखील उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मात्र आता निवडणूक आयोगाने राज्यातील 288 जागांसाठी किती उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत याची माहिती दिली आहे.

निवडणूक आयोगाने दिली माहिती :
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या संख्येने मोठा उच्चांक गाठला आहे. तर राज्यात आत्तापर्यंत झालेल्या तेरा विधानसभा निवडणुकांच्या उमेदवारांच्या सरासरीच्या तुलनेत देखील तिप्पट उमेदवार यंदा मैदानात उतरले आहेत. तसेच आता विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ही 29 ऑक्टोबर असल्याने आता मुदत संपली आहे.

अशातच आता उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर राज्यात 288 मतदार संघात तब्बल 7 हजार 995 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र आजपर्यंतच्या इतिहासात 13 विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. मात्र त्यावेळी सरासरीने 2 हजार 581 उमेदवार निवडणूक लढवायचे. मात्र आता तीनपटीने वाढ झाली आहे.

विधानसभेच्या रिंगणात 7995 उमेदवार :
यंदा 288 जागांसाठी तब्बल 7 हजार 995 उमेदवार उभे राहिले आहे. त्यामुळे यावेळेची निवडणूक देखील अत्यंत चुरशीची होणार असल्याची चित्र दिसत आहेत. मात्र आता या निवडणुकीमध्ये नेमकं कोणाचे वर्चस्व राज्यात असणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अशातच आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मदत जरी संपली असेल तरी देखील महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं चित्र हे 4 नोव्हेंबरलाच स्पष्ट होणार आहे. कारण 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज घेण्याची मुदत असणार आहे. त्यामुळे आता राज्यात नेमकं काय घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.