राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा – संजय राऊत

0
310

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी भाजपाशी युती करत सत्ता स्थापन केली. मात्र, सत्ता स्थापन होऊन २ आठवडे उलटले तरी राज्य सराकारडून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय घेण्यात येत नाहीये. त्यामुळे विरोध पक्षाकडून मंत्रिमंडळ विस्ताराला लागणाऱ्या विलंबावर टीका करण्यात येत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी दोन मंत्र्यांवरच चालणारे राज्य सरकार असंवैधानिक असल्याची टीका केली आहे. एवढचं नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही राऊतांनी केली आहे.

‘बार्बाडोस देशाची लोकसंख्या २.५ लाख असूनही त्यांचे मंत्रिमंडळ २७ सदस्यांचे आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या तर १२ कोटी आहे. मात्र, राज्यात केवळ २ सदस्यांचे मंत्रिमंडळ आहे. हे मंत्रिमंडळ मनमानी निर्णय घेत असून संविधानाचा आदर कुठे आहे?’ असा प्रश्नही राऊतांनी केला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा निकाल येईपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी राऊतांनी केली आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याचा प्रश्नच येत नाही. ही तुमच्या मालकीची कंपनी नाही, की मनात आलं तेव्हा तुम्ही निर्णय घेतला. हे सरकार संवैधानिक पद्धतीने चाललेलं आहे. त्यामुळे बुद्धीबेध करुन अशा वार्ता करु नका, असा सल्ला भाजपा नेते आशिष शेलारांनी राऊतांना दिला आहे.