राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा अशीच निवडणूक, २८८ जागा लढवणार

0
84

मुंबई, दि. २१ ऑगस्ट (पीसीबी)- 57 लाख कुणबी दाखले घेऊन मराठा समाज ओबीसीमध्ये घुसला आहे, हे स्वतः मनोज जरांगे बोलत आहेत. तरीदेखील सरकार काही बोलत नाही. म्हणून आता आम्ही विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे 288 जागा लढण्याचा आम्ही निर्णय घेतल्याची माहिती ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे. लोसंख्येच्या प्रमाणत तिकीट दिलं जाईल असंही ते म्हणाले.

राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा अशीच निवडणूक पार पडणार
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको अशी भुमिका कुणीच घेतं नाही. म्हणून आम्ही आता निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. कारण राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा अशीच निवडणूक पार पडणार असल्याचे शेंडगे म्हणाले. लोकसभा निवडणुकीत प्रकाश अंबेडकर यांनी आमच्यासोबत प्रचारसभा घेतल्या आणि ऐन निवडणुकीत वेगळी भूमीका घेतली. कारण सुरुवातीला आम्हाला पाठिंबा दिला आणि ऐनवेळी धंनदांडग्यांना प्रकाश अंबेडकर यांनी पाठिंबा दिला. माझा पाठिंबा सांगलीत त्यांनी काढून घेतला आणि विशाल पाटलांना पाठिंबा दिला. दूसरीकडे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला. त्यामुळं प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी या नावात नेमकं कोण बसतं? हे त्यांनी स्पष्ट करावं असा टोलाही शेंडगेंनी लगावला.

199 मतदारसंघात सर्व्हे पूर्ण झाल्याची शेंडगेंची माहिती
मनोज जरांगे पाटील जर उमेदवार उभे करणार असतील तर ओबीसी उमेदवारही उभा राहतील, आमचं बहुमत आहे असं वक्तव्य प्रशास शेंडगे यांनी काही दिवसापूर्नी केलं होतं. 60 टक्के जाती या ओबीसी आहेत. दलित आणि मुस्लिमांना सोबत घेतलं तर आम्ही 80 टक्के जातो. आमचेही 199 मतदारसंघात सर्व्हे पूर्ण झाले असून आम्हीही तशीच भूमिका घेऊ शकतो असंही ते म्हणाले होते. आर्थिक मागास प्रवर्गातून 10 टक्के आरक्षण मिळत असून त्याचा लाभही मराठा समाजाला होत आहे. या मधील 10 टक्क्यांपैकी साडे आठ टक्के आरक्षण हे मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी घेतलं आहे असं प्रकाश शेंडगे म्हणाले होते. अशातच आता प्रकाश शेंडगे यांनी विधानसभेच्या 288 जागा लढवण्याचा एल्गार केला आहे. तसेच राज्या तमराठा विरुद्ध ओबीसी अशीच लढत होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आगामी विधानसभेत रंगत निर्माण होण्याची शक्यता आहे.