मागील वेळी ज्या २६ महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या (आता ही संख्या २९ झाली आहे), त्यात भाजपाला सुमारे १.२० कोटी मते मिळाली. टक्केवारीच्या भाषेत सांगायचे झाल्यास, हे प्रमाण ३१.३० टक्के इतके होते (फेब्रुवारी २०१५ ते डिसेंबर २०१८). त्या आधीच्या निवडणूक चक्रात (फेब्रुवारी २००९ ते डिसेंबर २०१३) भाजपाला याच महापालिकांमध्ये केवळ ०.२४ कोटी (११.५९ टक्के) मते मिळाली होती. भाजपाची ही मोठी झेप त्यांच्या मजबूत पक्ष संघटनेची ताकद आणि केंद्रात व राज्यात समान सत्ता असण्याचा परिणाम असल्याचे मानले जाते.
शहरी भागातील भक्कम आधार –
एक लक्षवेधी बाब म्हणजे, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने २८८ पैकी १३२ जागा जिंकल्या होत्या, त्यात त्यांची मतांची टक्केवारी २६.९६ टक्के होती. ही टक्केवारी महानगरपालिका निवडणुकांमधील त्यांच्या मतांच्या तुलनेत बरीच कमी आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, याचे मुख्य कारण म्हणजे बहुतांश महानगरपालिका शहरी भागात आहेत. या भागात भाजपाची ताकद आहे आणि त्यांचा जनाधार अधिक संघटित आहे.
२०१४ मध्ये महाराष्ट्रात स्वबळावर सत्तेत आल्यापासून, भाजपाने आपली संघटनात्मक बांधणी, प्रचाराची दिशा आणि युतीचे समीकरण महानगरपालिका राजकारणाच्या गरजेनुसार बदलले आहे. महानगरपालिका निवडणुकांमध्ये स्थानिक स्तरावरील मोर्चेबांधणी, संसाधनांवरील नियंत्रण आणि बूथ स्तरावरील सक्रियता महत्त्वाची असते. २०१५ पासून भाजपाने या क्षेत्रांत सातत्याने गुंतवणूक केली आहे.
विधानसभा निवडणुका, राज्याच्या स्तरावरील मुद्दे, नेत्यांचे चेहरे आणि युती-आघाडीच्या समीकरणांवर अवलंबून असतात; मात्र महानगरपालिका निवडणुका वॉर्डा-वॉर्डात, कंत्राटदारांच्या पातळीवर आणि मतदारांच्या विविध गटांना गृहीत धरून लढवल्या जातात. “भाजपाला मिळालेले हे यश केवळ त्यांच्या ताकदीमुळेच नाही, तर विरोधी पक्षांमधील फूट, काँग्रेससारख्या पारंपरिक शहरी पक्षांची कमकुवत झालेली पकड आणि राज्याची व केंद्राची सत्ता स्थानिक पातळीवर संघटनेत रूपांतरित करण्याची भाजपाची क्षमता, यामुळे शक्य झाले आहे,” असे राज्यातील एका विरोधी नेत्याने सांगितले.
इतर पक्षांची वर्चस्वासाठी धडपड
दुसरीकडे, एकेकाळी महाराष्ट्रातील शहरी भागावर वर्चस्व गाजवणाऱ्या पक्षांना आपले स्थान टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. काँग्रेसला पूर्वी ०.४२ कोटी
तरी मतांची टक्केवारी १५.५३ टक्क्यांपर्यंत खाली आली. यावरून भाजपाच्या विस्ताराच्या वेगाशी जुळवून घेण्यात काँग्रेसला अपयश आल्याचे दिसून येते.
मुंबई आणि इतर शहरांमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या बलाढ्य असलेल्या एकसंघ शिवसेनेचीही पीछेहाट झाली. मागील निवडणुकांत मिळालेल्या ०.३० कोटी (१४.३१ टक्के) मतांवरून या पक्षाने ०.७१ कोटी मतांपर्यंत मजल मारली, तरीही त्यांची मतांची टक्केवारी १८.४९ टक्क्यांवर स्थिरावली. भाजपाच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी हे यश पुरेसे नव्हते.
राष्ट्रवादी काँग्रेसची (एनसीपी) स्थितीही फारशी वेगळी नव्हती. त्यांची मते ०.३४ कोटी (१६.३९ टक्के) वरून ०.४२ कोटींपर्यंत वाढली असली, तरी मतांची टक्केवारी ११.०५ टक्क्यांपर्यंत घसरली. ज्या शहरी पट्ट्यात भाजपाने आपले स्थान बळकट केले आहे, तिथे राष्ट्रवादीच्या प्रभावाला ओहोटी लागल्याचे हे लक्षण आहे. एकंदरीत ही आकडेवारी महाराष्ट्राच्या नागरी राजकारणातील मोठे बदल दर्शवते.
यादरम्यान विरोधी पक्षांची मते विभागली गेली किंवा त्यांना आपल्या पारंपरिक क्षेत्राबाहेर विस्तार करता आला नाही, मात्र भाजपाने स्वतःची व्याप्ती वाढवली असे या आकडेवारीवरून दिसून येते. आज भाजपा महाराष्ट्रातील महानगरपालिकांमध्ये सर्वाधिक मते मिळवणारा एकमेव मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे, त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीतही भाजपा वरचढ ठरणार का की इतर पक्षांना संधी मिळेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
२६ महानगरपालिका निवडणुकीतील मतांची टक्केवारी
पक्ष मागील निवडणुका (फेब्रुवारी २०१५ – डिसेंबर २०१८) त्या आधीच्या निवडणुका (फेब्रुवारी २००९ – डिसेंबर २०१३)
भाजपा१.२० कोटी मते (३१.३०%) ०.२४ कोटी मते (११.५९%)
शिवसेना ०.७१ कोटी मते (१८.४९%) ०.३० कोटी मते (१४.३१%)
काँग्रेस ०.५९ कोटी मते (१५.५३%) ०.४२ कोटी मते (२०.४५%)
राष्ट्रवादी ०.४२ कोटी मते (११.०५%) ०.३४ कोटी मते (१६.३९%)
एकूण मतदान ३.८३ कोटी २.०६ कोटी















































