दि.०१(पीसीबी)राज्यातील नगरपालिका निवडणुकांसाठी उद्या, २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, आज रात्री १० वाजता प्रचाराचा तोफा थंड होणार आहे. मात्र, प्रचाराच्या अंतिम दिवशीही राजकीय रंगत रंगली होती.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील राजगुरुनगर येथील सभेत उमेदवारांना सल्ला देताना मतदारांच्या मानसिकतेवर मिश्कील भाष्य केले. त्यांनी म्हटले, “मतदार आदल्या रात्री खूप विचार करतात, घराबाहेर आवाज आला की आतून म्हणतात, होय-होय मी जागा आहे. कोणाला मतदान करायचं हे विचार करतोय. उमेदवारांनी आज रात्री डोळ्यात तेल घालून पाहावं.” या मिश्कील टिप्पणीवर उपस्थितांत एकच हशा पिकला.
अजित पवारांनी आपल्या प्रशासनावर पकड आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरही भाष्य केले, “मी कामाचा माणूस आहे. ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असला तरी मी एक रुपयाचा मिंदा नाही. दाखवा मला, मी काम करताना पैशाचा हात घेतला आहे का. उलट प्रशासन मला टरकून राहतं.”येत्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. मात्र, आचारसंहिता लागू असल्याने ते थोडेसी सावध बोलले, “तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी काय करावं लागेल ते पाहतो, मात्र आचारसंहितेत बोलता येणार नाही. तुम्ही ऐकलं तर मी तुमचं ऐकेन.असा टोला त्यांनी यावेळी लगावला ”राज्याच्या अनेक नगरपालिकांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरु असून, उमेदवारांसाठी प्रचाराचा अंतिम दिवस राजकीय रणनीतीसाठी निर्णायक ठरत आहे.असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.











































