राज्याच्या मंत्रिमंडळात आणखी 23 मंत्र्यांची भर पडू शकते

0
280

चंद्रपूर, दि. २ (पीसीबी) : राज्याच्या मंत्रिमंडळात आणखी 23 मंत्र्यांची भर पडू शकते, अशी माहिती भाजप नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या तुलनेत 15 टक्के मंत्री करता येतात. त्यानुसार राज्यात एकूण 43 मंत्री करता येतात. यापैकी 20 मंत्री सध्या कार्यरत असून, आणखी 23 मंत्र्यांची निवड केली जाऊ शकते. यात भाजप-शिवसेनेच्या आमदारांना पुढील विस्तारत संधी मिळू शकते. हा विस्तार येत्या काही दिवसात लवकरच होऊ शकतो, असेही मुनगंटीवार म्हणाले.

राज्य मंत्रिमंडळाचा पुढचा विस्तार लवकरच होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात आणखी 23 मंत्र्यांची भर पडू शकते. कारण सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या तुलनेत 15 टक्के मंत्री करता येतात. म्हणजेच एकूण 43 जणांचं मंत्रिमंडळ होऊ शकतं. सध्या 20 मंत्री राज्याचा कारभार पाहात आहेत. त्यामुळे आणखी 23 जणांना मंत्रिमंडळास स्थान मिळू शकते, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

राज्यात प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री मिळू दे अशी मागणी एकनाथ खडसे यांनी बाप्पाकडे केली होती. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खडसे हे आदरणीय राहिलेले नेते आहेत. त्यांनी व्यक्त केलेल्या मतावर मी तक्रार करणे योग्य नाही. शेवटी मत व्यक्त करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. पालकमंत्र्यांची घोषणा या गणेशोत्सवातच होईल, याबद्दल त्यांनी मनात शंका ठेवू नये. राज्याच्या हितासाठी देवाने त्यांना सद्बुद्धी द्यावी, असा चिमटा मुनगंटीवार यांनी घेतला.

एकीकडे कॅबिनेट विस्ताराची चर्चा सुरु असताना, दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी नवा भूकंप होण्याची चिन्हं आहेत. काँग्रेसचा एक गट फुटून शिंदे गटात सहभागी होण्याची चर्चा आहे. हा गट फुटल्यास काँग्रेस आमदारांना शिंदे कॅबिनेटमध्ये स्थान मिळू शकते. महाराष्ट्र काँग्रेसमधील खळबळ विधानपरिषद निवडणुकीपासूनच दिसलेली आहे. काँग्रेसमधील काही मंत्र्यांसह आमदारांचा गट फुटण्याची चर्चा विधानपरिषद निवडणुकीच्या निकालापासूनच राजकीय वर्तृळात सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसमधील गट फुटून शिंदे गटात सामिल झाला तर काँग्रेसमधील काही माजी मंत्र्यांना नव्या सरकारमध्ये संधी मिळणार का? याकडे लक्ष आहे.