राज्याचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार…

0
276

मुंबई,दि.०२(पीसीबी) – राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राजभवनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. अजित पवार यांच्या शपथविधीमुळे राज्यात नवीन राजकीय समीकरण तयार झाले आहे. राज्यात राष्ट्रवादी, शिंदे गट आणि भाजपची युती झाली आहे. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर महायुतीचं बळ वाढलं आहे. आज रविवारी, सकाळपासूनच राजभवनात हालचाल सुरू होती. त्यामुळे अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून सरकारमध्ये दाखल होण्याच्या चर्चा होत्या. या चर्चा आता संपल्या असून अजित पवार सरकारमध्ये सामील झाले आहेत.