दि. १२ (पीसीबी) : ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त निलेश तापकीर फाउंडेशन आणि मर्दानी खेळ असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी, श्री गजानन मंगल कार्यालय लोहगाव, पुणे येथे भव्य मर्दानी खेळ आणि योगासन राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.आपल्या संस्कृतीचे जतन व्हावे नवीन पिढी मनाने व शरीराने सदृढ व बलशाली व्हवी, महीला व तरुणीचे आत्मबल वाढावे, मोबाईल आणि टीव्ही पासून मुलं दूर होऊन मैदानात खेळण्यासाठी उत्साहित व्हावी या उद्देशाने स्पर्धा आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण १४ जिल्ह्यातील 723 खेळाडूनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये ८ वर्षापासून ते ८७ वयोगटातील खेळाडूंनी सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी करत पदक मिळविले.
यामध्ये अनुक्रमे पुणे ग्रामीण प्रथम क्रमांक, पिंपरी चिंचवड द्वितीय क्रमांक, जालना जिल्हा तृतीय क्रमांक, सातारा जिल्हा चौथा क्रमांकाचे अजिंक्यपद पटकावले.तसेच या प्रसंगी निलेश तापकीर फाउंडेशन यांच्या वतीने पारंपारिक युद्ध कला जोपासणारे मा. संजय बनसोडे यांना आणि योगाचार्य मा. नितीन बांगर यांना क्रीडा रत्न जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऍडव्होकेट रणजीत सांगळे मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचे वकील, माजी आमदार जगदीश मुळीक, उद्योजक वेद प्रकाश जी शर्मा, कॅप्टन बाबू पोळके, विश्व हिंदू परिषद चे हनुमंत खांदवे, आर. एस. एस. चे नाथाराम चौधरी, संतोष लाल खांदवे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी सामाजिक स्पर्धा शैक्षणिक विषयावर मान्यवरण कडून मार्गदर्शन करण्यात आले.
उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते विजयी खेळाडूंना बक्षीस देण्यात आली.
या स्पर्धेमध्ये पंच म्हणून स्मिता धिवार मॅडम केतन नवले सर जालना संघ व्यवस्थापक भूषण यादव, अभय नवले, सुदर्शन सूर्यवंशी, गणेश गेजगे, अजय नवले, साक्षी सैनी, श्रेया दंडे, प्रिया सैनी, वैदेही नवले, शिवदत्त सिंग, यश बालगुडे, सोहम शेवाळे, यांनी पंच म्हणून कामगिरी बजावली.
निलेश तापकीर फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश भाऊ तापकीर, अरविंद साळवे, मर्दानी खेळ असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष संजय बनसोडे, सचिव किरण अडागळे यांनी स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले.