राज्यसभेच्या जागेसाठी १०० कोटी ???

0
369

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – राज्यसभेच्या जागा आणि राज्यपालपदाची खोटी आश्वासने देऊन लोकांना 100 कोटींना चूना लावणाऱ्या रॅकेटचा केंद्रीय अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सीबीआयने एफआयआरमध्ये लातूरचे कमलाकर प्रेमकुमार बंडगर, कर्नाटकातील बेळगावचे रवींद्र विठ्ठल नाईक आणि महेंद्र पाल अरोरा, अभिषेक बुरा आणि दिल्ली-एनसीआरचे मोहम्मद एजाज खान यांची नावे दिली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बंडगर स्वत:ला सीबीआयचा वरिष्ठ अधिकारी म्हणून भासवत होता. एवढेच नाही तर तो उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी असलेले संबंध लोकांसमोर दाखवत असे. तसेच तो बुरा, अरोरा, खान आणि नाईक यांना लोकांना काम देण्याचे आमिष दाखवून करोडो रुपयांचा व्यवहार करण्यास सांगत असल्याचेही समोर आले आहे. एवढेच नव्हे तर बड्या नेत्यांच्या जवळ असल्याचे भासवून आरोपी लोकांची दिशाभूल करायचे. मात्र, सीबीआयने त्यांचे मनसुबे उधळून लावले आहेत.

सीबीआयने या प्रकरणात चारहून अधिक जणांना आरोपी केले आहे. महाराष्ट्रातील रहिवासी कमलाकर प्रेमकुमार बंडगर, कर्नाटकचा रहिवासी रवींद्र विठ्ठल नाईक, महेंद्र पाल अरोरा आणि दिल्लीचा रहिवासी अभिषेक बुरा अशी यातील काहींची नावे आहेत.