राज्यपाल कोश्यारी यांना भाजपने प्रवक्ते पदी नेमावे : ॲड. सचिन भोसले

0
320

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केंद्र सरकारने परत बोलावून त्यांची भाजपच्या प्रवक्ते पदी नेमणूक करावी. मागील कार्यकाळात आणि काल देखील राज्यपाल यांनी महाराष्ट्र विषयी, महाराष्ट्रातील जनतेविषयी अपमान जनक वक्तव्य केले आहे. राज्यपाल पद हे संविधानात्मक पद आहे. या पदावर कोश्यारी यांची भाजपाने नेमणूक केली आहे. त्यांच्या मनात महाराष्ट्र बाबत असणारी खदखद ते व्यक्त करीत आहेत. खर तर त्यांच्या तोंडून भाजपाचे नेतेच बोलत आहेत. भाजपने आता यांना दिल्लीत परत बोलावून भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्ते पदावर त्यांची नेमणूक करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर शिवसेनाप्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी केली.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईत एका कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील जनतेचा अवमान करणारे वक्तव्य केले होते. त्यांचा निषेध करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर शिवसेनाप्रमुख ॲड. सचिन भोसले यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (दि. ३१ जुलै) पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात शहर शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कोश्यारी यांचा निषेध केला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, महिला जिल्हा संघटिका शैलजा खंडागळे, शहर संघटिका ॲड. उर्मिला काळभोर, शहर प्रसिद्धी प्रमुख भाविक देशमुख, विधानसभा प्रमुख अनंत कोराळे, महिला विधानसभा संघटिका कल्पना शेटे, सरिता साने, युवासेना विधानसभा अधिकारी माऊली जगताप, निलेश हाके, शहर संघटक रोमी संधू , उपशहर प्रमुख तुषार नवले, संतोष पवार, नवनाथ तरस, पांडुरंग पाटील, हरीश नखाते, नेताजी काशीद, सुधाकर नलावडे, कुणाल तापकीर, शैलेश मोरे, युवराज कोकाटे, वैशाली कुलथे, स्मिता जगदाळे, शारदा वाघमोडे, विधानसभा संघटक व समन्वयक महेश कलाल, दिलीप भोंडवे, अमित दर्शले, अक्षय पांढरे, दादासाहेब नरळे, विभाग प्रमुख नितीन दर्शले, तुषार तरस, दत्ताराम साळवी, श्रीमंत गिरी, संजय ससाने, अमित निंबाळकर, समीर पवार, संतोष वाळके, कृष्णा वाळके, गोरख नवघणे, गोरख पाटील, दिलीप दंडवते, नितीन बोंडे, शिवाजी कुराडकर, मोहन बारटक्के, संदीप भालके, सचिन चिंचवडे, प्रदीप चव्हाण, सय्यद पटेल, महिला विभाग संघटिका- उज्वला सावंत, गौरी घंटे, शिल्पा अनपण, नंदा दातकर, अश्विनी खंडेराव, उपविभाग प्रमुख कुदरत खान, प्रवीण पाटील, शिवाजी चव्हाण, अनिल घोरपडे, सागर शिंदे, सचिन घाटे, गणेश रोकडे, चंद्रशेखर कणसे, पांडुरंग कदम, सूर्यकांत देशमुख, मनोज परांडे, सुदर्शन देसले, राजू भालेकर, सागर शिंदे, अमृता सुपेकर, तसलीमा शेख, साधना काशीद, अनिता तळेकर, मीना डेरे, सविता सोनवणे, गजानन धावडे, कैलास नेवासकर, प्रतीक झुंबरे, शाखाप्रमुख व महिला आघाडी शाखा संघटिका प्रमोद दर्शले, अझरुद्दीन मुजावर, अमित शिंदे, दत्ता गिरी, मनोहर कानडे, कुदरत खान, माजिद शेख, किशोर सातपुते, कृष्णदेव त्रिंबके, शहादेव अवसरमल, नरसिंग माने, प्रियशील पोटभरे, गणेश झिळे, राजेंद्र पलांडे, कुणाल वाघमारे, महेंद्र तांबे, प्रशांत हादगे, सचिन साठे, जयराम लांडगे, लव कोकाटे, सुनील दिघे, योगिनी मोहन, पंकज दीक्षित, पंकज टोके, प्रदीप चव्हाण, रामदास गाढवे, राहुल पालांडे, गंगाधर काळे, शंकर कुराडकर, गोपाळ मोरे, सुधीर कुंभार, तुलसी सांगडे, अरुण पात्रे, भागवत शितोळे, प्रीतम तेलंग, सुजित साळवी, मयूर फिरके, स्वप्निल शिंदे, सागर शिंदे, गणेश झिळे, इत्यादी शिवसेना महिला आघाडी युवासेना आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी ॲड. उर्मिला काळभोर निषेध करताना म्हणाल्या की, राज्यपाल यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या अस्मितेचा अपमान केला आहे. राज्यपालांनी पालक म्हणून काम करावे, परंतु ते भाजपाचे प्रवक्ते पदाधिकारी असल्यासारखे वक्तव्य करतात. या राज्यपालांनी या पदाची लायकी घालवली आहे. या पदावर कसे वागावे याचे त्यांना ज्ञान नाही. महाराष्ट्राचा इतिहास त्यांना माहित नाही. राज्यपालांनी जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे यांचे चरित्र वाचावे असेही ॲड. उर्मिला काळभोर म्हणाल्या.
तसेच यावेळी गुलाब गरुड निलेश मुटके आदी व इतर पदाधिकारी यांनी राज्यपालांचा निषेध करणारी भाषणे केली. तसेच सर्व शिवसैनिकांनी राज्यपालांचा निषेध करणाऱ्या घोषणा दिल्या.