पिंपरी-चिंचवड दि . २७ ( पीसीबी ) : वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी राजेंद्र हगवणे आणि दिर सुशील राजेंद्र हगवणे याला आश्रय देणाऱ्या पाच जणांना आज बावधन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कर्नाटकमधील माजी मंत्र्याच्या मुलाचा समावेश आहे.
काँग्रेसचे माजी ऊर्जामंत्री तथा आमदार विरकुमार पाटील यांचे चिरंजीव प्रीतम विरकुमार पाटील याचा समावेश आहे. मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे (वडगाव मावळ), बंडू लक्ष्मण फाटक (लोणावळा), अमोल विजय जाधव (पुसेगाव, सातारा), राहुल दशरथ जाधव (पुसेगाव सातारा) यांना देखील अटक करण्यात आली आहे.
वैष्णवी शशांक हगवणेच्या आत्महत्येप्रकरणी आत्तापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना मदत करणाऱ्या आणि आश्रय देणाऱ्या इतर पाच जणांना बावधन पोलिसांनी आज बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस तपासात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी वडगाव मावळ, लोणावळा, महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आणि सातारा या ठिकाणी आश्रय घेतल्याचे पोलीस तपासात समोर आलं होतं. याप्रकरणी पाच जणांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. चौकशीअंती त्यांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे पोलिसांपासून लपण्यासाठी पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आश्रय घेतल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालं होतं. वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी आज शशांक हागवणे, लता हगवणे आणि करिष्मा हगवणे यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यांना पुढील दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.