राजेंद्र जगताप यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला अजित पवार यांची उपस्थिती

0
565

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांचा अभिष्टचिंतन सोहळा पिंपळे गुरव येथील मुक्तांगण हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.या सोहळ्याच्या निमित्ताने पिंपळे गुरव येथे विजयराज कॉलनी पिंपळे गुरव येथे वृक्ष मित्र अरुण पवार ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच अजित गव्हाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पि चि शहर अध्यक्ष,स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक 41,44,45 पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पिंपळे गुरव नवी सांगवी परिसरातील सुमारे 50 ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांचा पुष्प व बॅग देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी अनेक ज्येष्ठ नागरिक यांनी राजेंद्र जगताप यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत जगताप परिवराबद्दल असलेले प्रेम व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तसेच विधान सभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांना वाढदिवसाचा केक कापून शुभेच्छा दिल्या.तसेच मुक्तांगण हॉल 60 फुटी रोड,पिंपळे गुरव,पुणे 61 येथे होणाऱ्या माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नोकरी मेळावा तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र कथा अंतर्गत कैवल्याचा पुतळा या विषयावर होणाऱ्या चरित्र कथा सप्ताह सोहळ्यास शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष मा विजू आण्णा जगताप, राष्ट्रवादी काँगेस पार्टी पि चि शहराध्यक्ष मा अजित गव्हाणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका माजी स्थायी समिती अध्यक्ष मा अतुल शितोळे , सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा सुनील टोणपे,मा अरुण पवार , माजी स्वीकृत नगरसेवक मा शिवाजी पाडुळे,मा.श्याम जगताप,मा तानाजी जवळकर, सांगवी विकास मंचाचे अध्यक्ष मा.महेश भागवत,मा संदीप राठोड,मा सुरेश धाडिवल,मा विष्णू आण्णा शेळके, प्रा महादेव रोकडे,मा सुनील कदम,मा सतीश चोरमले,मा साहेबराव तुपे,मा जावेद शेख, सुनील इंगळे, मा पंकज मालवीया,मा.शेखर निकम ॲड.आशुतोष काशीकर,शहा,विजयराज मित्र मंडळाचे अध्यक्ष कु अभिषेक जगताप व मंडळाचे सर्व सभासद,,उमाताई पाडुळे, संजवणी पुराणिक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक 41, 44,45 पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ पि चि शहर अध्यक्ष विजू आण्णा जगताप तसेच वृक्ष मित्र मा अरुण पवार यांनी मा अजितदादा पवार यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवून सन्मान केला.