राजस्थानात भाजप सत्तेत येणार, पण लोकांची सर्वाधिक पसंती अशोक गहोलोत

0
318

देश,दि.२८(पीसीबी) – राजस्थानमध्ये विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. सत्ता राखण्यासाठी काँग्रेस जोरदार प्रयत्न करत आहे. तर भाजपही सत्ता हस्तगत करण्यासाठी कंबर कसून कामाला लागली आहे. यातच आता राजस्थानबाबतचा एक ताजा सर्व्हे पुढे आला आहे. सी- व्होटरने नुकत्याच्या केलेल्या सर्व्हेच्या अंदाजानुसार राजस्थानमध्ये भाजपची पुर्ण बहुमतात सत्ता येऊ शकते, मात्र काही आकड्यांमुळे भाजपची चिंता देखील वाढण्याची चिन्हे आहेत.

सी-व्होटरने जाहीर केलेल्या ओपिनियन पोलमध्ये राजस्थानात भाजपचे पुर्ण बहुमतात सरकार स्थापन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार राजस्थानच्या 200 जागांच्या विधानसभेत भाजपला 109 ते 119 जागा मिळण्याच्या अंदाज आहे. तर काँग्रेसला केवळ 78 ते 88 जागा मिळण्याची शक्यता आहे. इतर पक्ष आणि अपक्षांना 1-5 जागा मिळतील, असे दावा करण्यात आला आहे.

या नव्या सर्व्हेनुसार विधानसभा निवडणुकीत भाजपला 46 टक्के मते मिळू शकतात. तर काँग्रेसला 41 टक्के मिळण्यचा अदाज सांगितला गेला आहे. इतरांना 13 टक्के मते मिळतील असेही म्हंटले आहे.

सर्वेक्षणात भाजपचे सरकार येणार असा दावा करण्यात आला असला तरी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा करिष्मा दिसून आला आहे. ही भाजपसाठी चिंतेची बाब ठरू शकते. सर्वेक्षणात सहभागी लोकांना जेव्हा विचारण्यात आले, मुख्यमंत्रीपदासाठी पहिली पसंती कोण आहे? तेव्हा बहुतांश लोकांनी विद्यमान मुख्यमंत्री गेहलोत यांना पसंती दिली आहे.

35 टक्के लोकांनी गेहलोत यांना पहिली पसंती दिली, तर 25 टक्के लोकांनी भाजप नेत्या वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली आहे. 19 टक्के लोकांनी सचिन पायलटांना पसंती दिली. तर 9 टक्के लोकांनी केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांना आपली पसंती दर्शवल्याचे सांगितले. तर 5% लोकांनी राज्यवर्धन सिंह राठोड आणि 7% लोकांनी इतरांची निवड केली.
सर्वेक्षणातील आणखी एक गोष्ट जी भाजपला धडकी भरवू शकते. राजस्थानमधील बहुतांश लोक गेहलोत यांच्या कामावर समाधानी आहेत. 41 टक्के लोकांनी गेहलोत यांच्या कामावर समाधानी असल्याचे सांगितले