राजस्थानातही मणिपूर – गर्भवती महिलेला मारहाण करून विवस्त्र करून धींड

0
465

भारत, दि. २ (पीसीबी) – आपल्या देशात आजही महिलांना अत्यंत खालची वागणूक मिळत असल्याचे वारंवार निदर्शनास येते. जे मणिपूर मध्ये घडले अगदी तसाच प्रकार राजस्थानात घडला आहे. महिला अत्याचाराच्या घटनेची राजस्थानमध्ये पुनरावृत्ती झालीय. राजस्थानमधील प्रतापगड जिल्ह्यात एका महिलेला मारहाण करून विवस्त्र केल्याचं समोर आलंय. ती महिला गर्भवती आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने देशात संतापाची लाट उसळलीये. ही महिला जीवाच्या आकांताने रडत होती. पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केलीये.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी पहाडी गावातील एका 21 वर्षीय महिलेले तिच्या पती आणि नातेवाईकांनी तिला विवस्त्र करून तिची धींड गावातून तिची धींड काढली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी दखल घेत महिलेच्या पतीसह अन्य तीन जणांना ताब्यात घेतले आहे. इतर सहभागी नातेवाईकांचा पोलीस तपास करत आहेत. पोलिस महासंचलकाचे उमेश मिश्रा यांनी घटनेची गंभीर दखल घेतली आहे. मिश्रा यांनी तातडीने एडीजी दिनेश एमएन यांना प्रतापगडला या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

या प्रकरणी फरार नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी सहा जणांची टीम गठित करण्यात आली आहे. प्रतापगढ पोलिस अधीक्षक अमित कुमार या संदर्भात अधिक तपास करत आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, एका महिलेलेा मारहाण करून विवस्त्र केल्याचा एक व्हिडीओ मीडियावर व्हायरल होत आहे. सुसंस्कृत समाजात अशा घटनांना स्थान नाही.आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असून हे प्रकरण फास्ट्र ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार आहे.

माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेंनी सरकरवर टीका केली आहे. वसुंधरा राजे म्हणाले, गर्भवती महिलेचा न विवस्त्र धींड काढलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला मात्र प्रशासनाला मात्र याबाबत कोणतीच माहिती नन्हती. या घटनेने राजस्थाची मान शरमेने झुकली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर शेअर न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.