राजश्री जायभाय यांचाही राजीनामापिंपरी चिंचवड शहर भाजप नवीन कार्यक्रमातील नाराजी सुरूच आहे. माजी उपमहापौर तुषार हिंगे, जेष्ठ कार्यकर्ते संतोष तापकीर यांच्या पाठोपाठ राजश्री जयभाय यांनीही एक खरमरीत पत्र लिहून कार्यकरणी सदस्यपदाचा राजीनामा शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना पाठविला आहे.

0
3

श्रीमती जायभाय त्यांनी लिहिलेले पत्र जसे आहे तसे देत आहोत….

सप्रेम नमस्कार,
सन्माननीय जिल्हाध्यक्ष साहेब, आपली पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या या निवडीचे स्वागत केले. मी देखील आपल्याला जिल्हा अध्यक्ष पदाच्या पुढील कार्यासाठी आपल्याला शुभेच्छा दिल्या होत्या. आपण आपली जिल्हा कार्यकारणी नुकतीच जाहीर केली आहे. या जिल्हा कार्यकारणी मध्ये आपण मी न मागितलेल्या जिल्हा कार्यकारणी सदस्य पदी माझी नियुक्ती केली आहे. वास्तविक पाहता मी भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हयाचा महिला गटामध्ये जिल्हा सरचिटणीस म्हणून इच्छुक होते. तरी देखील आपण मला ते दिले नाहीत. माझी गेली 16 वर्षापासून ची कारकीर्द लक्षात न घेता पक्षात नवख्या असलेल्या महिलेला आपण जिल्हा सरचिटणीस पद दिले. ही बाब मला न पटणारी आहे. या अगोदर सुद्धा मी जिल्ह्यावर तसेच प्रदेशावर विविध पदांवर काम केलेले आहे. असे असताना आपल्या या नवीन कार्यकारिणीत जिल्हा कार्यकारिणी सदस्य पद देऊन अपमानीत करत अहात. त्यामुळे मी आपण दिलेल्या या जिल्हा कार्यकारणी सदस्य या पदाचा राजीनामा आपल्याकडे देत आहे. मी जिल्हा कार्यकारणी सदस्य पदाचा जरी राजीनामा जरी देत असले तरी भारतीय जनता पार्टीची एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून आज पर्यंत ज्या पद्धतीने काम करत आली आहे त्याच पद्धतीने निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून यापुढेही कायम भारतीय जनता पक्षाचे काम करीत राहणार आहे. आपण मला दिलेल्या पदाबद्दल मी आपली आभारी आहे परंतु आपण दिलेले पद मी नाकारत असून त्या पदाचा मी देत असलेला राजीनामा आपण स्वीकारावा अशी आपणास नम्र विनंती.

आपली हितांचिंतक
सौ. राजश्री जायभाय