बालसाहित्य ‘ढब्बू ढेरपोट्या’चा सन्मान
पिंपरी (दिनांक : २८ एप्रिल २०२४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी, लातूर तर्फे दरवर्षी विविध साहित्य प्रकारात पुरस्कार दिले जातात. यंदाचा बालसाहित्यातील पुरस्कार राजन लाखे लिखित ‘ढब्बू ढेरपोट्या’ या किशोर काव्यसंग्रहास प्राप्त झाला आहे. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
लाखे यांना अनेक पुरस्कार मिळाले असून त्यांच्या ग्रंथसंपदेमध्ये ‘वास्तवरंग फुलताना’ , ‘मी पाहिलेला सूर्य’ , ‘सौंदर्याच्या गर्भातून’ , ‘मनातले माझ्या’ , ‘मन माझे मी मनाचा’ , ‘गुंता’ तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद झालेला ‘बकुळगंध’ आदी साहित्यकृतींचा समावेश असून त्यांचे बालसाहित्यातील हे पहिलेच पुस्तक आहे, ज्याची साहित्य क्षेत्राने दखल घेतली आहे.
सदर पुरस्कार सोहळा लातूर येथे होणार असून सदर सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
- प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२