दि.२१(पीसीबी)-पुण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धक्कादायक प्रकार घडल्याची चर्चा आहे. राजगुरुनगर नगरपरिषदेच्या नगरसेवक पदाच्या जागेसाठी चक्क लिलाव झाल्याचं बोललं जातंय. एका प्रभागात पुरुषांच्या जागेसाठी 1 कोटी तीन लाखांची बोली लागलीय अन् महिलांच्या जागेसाठी 22 लाखांची बोली लागली, अशी चर्चा राजगुरुनगरमध्ये जोरदार सुरुये. मात्र, यावर सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही ही मूग गिळून गप्प आहेत. परिणामी, आपापसात साटेलोटे झाल्यानं, ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ अशी भूमिका घेतल्याची जोरदार चर्चा आहे.
बोलीतील रकमेतून शहराचा विकास करायचं, असं ही एकमुखी निर्णय झाल्याचं बोललं जातंय. पण हे कोणत्या प्रभागात घडलं अन् ते उमेदवार कोण? याबाबतची वाच्यता कोणीचं करत नाहीये. आज बिनविरोध घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अशात कोण-कोण माघार घेतं अन् जे माघार घेतात त्याचं प्रभागात ही बोली लागली का? याबाबत तर्क-वितर्क लावले जाणार हे उघड आहे.
मात्र नगरसेवक पदासाठी पाच लाखाच्या आसपास खर्चाची मर्यादा आहे, अशात जर पुरुषांच्या जागेसाठी 1 कोटी 3 लाख आणि महिलांच्या जागेसाठी 22 लाखांची बोली लागेल असेल तर मग राज्य निवडणूक आयोग याबाबत काय निर्णय घेणार? कारण भविष्यात निवडणुकांमधील पदांसाठी असा लिलाव होऊ लागला तर ही नवी प्रथा पडण्याची भीती आहे. ही लाजिरवाणी प्रथा लोकशाहीची थट्टा उडवू शकते. त्यामुळे या चर्चेतील तथ्य आणि सत्यता तपासणे आता गरजेचं ठरलं आहे.
पुण्यात पवार काका-पुतणे एकत्र, लोणावळ्यात राष्ट्रवादी एकत्र, बिनशर्त पाठिंबा!
लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत एक मोठी आणि निर्णायक राजकीय घडामोड समोर आली आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून लोणावळ्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लोणावळ्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक १३ मध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलं आहे.यामुळे लोणावळ्यात राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही गटांनी एकत्र येत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. लोणावळ्यात मागील।काही दिवसांपासून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात संघर्ष दिसून आला आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट









































