राजकीय भूकंप-खासदार,आमदार, पदाधिकाऱ्यांचे राजीनामे सुरूच

0
267

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राजकीय नेते मोठ्या संख्येने पुढे आले आहेत. महाराष्ट्रात मोठ्या भूकंपाचे हादरे सुरू आहेत. दोन खासदार, तीन आमदार आणि असंख्य पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन सरकारला इशारा दिला आहे.

भाजप खासदार हेमंत पाटील, नाशिकचे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे, बीडच्या गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी देखील आमदारकीचा राजीनामा दिलाय. यानंतर आणखी एक मोठी बातमी समोर आलीय. खेड चे अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते यांनी तर सर्व खासदार अमदारानी राजीनामे दिले पाहिजेत असे म्हटले आहे.

खासदारांचे राजीनामे –
मराठा आरक्षणासाठी नाशिकचे शिंदे गटाचे आमदार हेमंत गोडसेंनी राजीनामा दिलाय.
काल शिंदे गटाचेच हिंगोलीचे खासदार हेमंत पाटलांनीही राजीनामा दिला.

आमदारांचे राजीनामे-
बीडच्या गेवराईतले भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय
काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर यांनीदेखील आमदारकीचा राजीनामा दिलाय. सुरेश वरपूडकर यांनी विधानसभा अध्यक्षांकडे पत्राद्वारे राजीनामा पाठवला आहे. सुरेश वरपूडकर हे परभणीच्या पाथरी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आहेत. मराठा धनगर तसेच मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केलंय. आमदार सुरेश वरपुडकर यांच्या मतदारसंघात तीन दिवसांपूर्वी ताफा आडवत काही युवकांनी राजीनामा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी आज राजीनामा दिलाय.

पदाधिकाऱ्यांचे राजीनामे-
नांदेडच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख नागेश पाटलांचा राजीनामा नांदेडमध्ये शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख बाबूराव कदम कोहळीकरांचा राजीनामा बीडमध्ये अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाणांचा राजीनामा
यवतमाळमध्ये माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकरांचा काँग्रेसमधून राजीनामा शिंदे गटाचे चिंचवड विधानसभा प्रमुख सुरेश राक्षेंचा राजीनामा बीडमधले शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख परमेश्वर तळेकरांचा राजीनामा मनमाडमध्ये माजी आमदार आणि मनमाड बाजार समितीचे सभापती संजय पवारांचा राजीनामा नांदेडमध्ये शिंदे गटाचे हदगाव इथले तालुकाप्रमुख विवेक देशमुखांचा राजीनामा कराडमधल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सतिश पाटील यांचा राजीनामा पंढरपूरच्या कौठाळी ग्रामपंचायतचे सदस्य बापू शिवाजी गोडसेंचा राजीनामा सोलापूरच्या माढ्यात वडाचीवाडी गावचे सरपंच रमेश भुईटेंनी राजीनामा दिला जळगावात भडगाव तालुक्यातल्या कजगाव ग्रामपंचायतीत 3 सदस्यांचे राजीनामे नगरच्या अहमदनगर इथल्या बुरुडगावच्या ग्रामपंचायत सदस्यांचा सामूहिक राजीनामा कोल्हापूरच्या पाडळी खुर्द गावात ग्रामपंचायत सदस्या नीलम कांबळेंचा राजीनामा परभणीच्या जिंतूरमध्ये वाघी बोबडे इथल्या सरपंच, उपसरपंचांसह सदस्याचे राजीनामे
पुण्याच्या दौंडमधल्या कानगाव ग्रामपंचायतीच्या ३ सदस्यांचा राजीनामा.