राजकीय खळबळ! महायुतीत बंडखोरीची शक्यता; ‘या’ भाजप नेत्याचे निवडणूक लढवण्याचे संकेत

0
4

रत्नागिरी, दि. 22 (पीसीबी) : विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर जागावाटप अंतिम टप्प्यात असतानाच रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे माजी आमदार बाळ माने यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिले आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात समर्थ पर्याय हवा असेल जर बदल हवाय तर उपलब्ध आहेत त्यापैकी एक चांगला समर्थ पर्याय काय असू शकतो म्हणुन मी मतदारांना साद घालत आहे. या विधानसभा मतदारसंघात सुमारे दोन लाख ८८ हजार मतदार आहेत. मतदारांना गृहीत धरून कोणतीही भूमिका घेणे हे मला चुकीचे वाटते. आजवर सगळे सर्वे झाले आहेत यामध्ये जनमत नक्की आहे की मतदारांना आताचा आमदार नको आहे आणि याच पार्श्वभूमीवरती मी सगळ्या मतदारांना आवाहन विनंती करतो मला अभिप्राय द्या अशा स्वरूपाची भूमिका बाळ माने यांनी मांडली आहे.

गेले अनेक दिवस भाजपाचे माजी आमदार बाळ माने हे उद्धव ठाकरे गटात प्रवेश करून निवडणूक लढवतील अशा चर्चा सुरू आहे. या चर्चा सुरू असताना माने यांनी अशा स्वरूपाची पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडल्याने रतन जिल्ह्यात रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महायुतीत मोठा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. गेली अनेक वर्ष मी भाजपाचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे यामध्ये १९९९ ते २००४ पर्यंत मी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून जनतेच्या आशीर्वादाने पक्ष नेतृत्वाच्या आशीर्वादाने मी विधानसभेत काम केलं. २२ ऑक्टोबर पासून आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणुकीच्या रणसंग्राम खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. भविष्यातील रत्नागिरी येथील या सगळ्या निवडणुकीत बाळ माने यांनी नेमकी कोणती भूमिका घेतली पाहिजे यासाठी युवा मतदार महिला भगिनी, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, ज्येष्ठ या सगळ्यांना मी आव्हान करतो की मला पुढील चार दिवसात मला अभिप्राय द्या म्हणजे मला पुढची भूमिका घेणं सोपं ठरेल असे सांगत विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आपण एक प्रकारे सज्ज असल्याचेच सांगितल बाळ माने यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे थेट स्पष्ट संकेत दिले आहेत.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उदय सामंत यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. तसेच तुम्ही महायुतीत आहात आणि तुमची पाऊल बंडखोरीच्या दिशेने नाहीत का या प्रश्नावर ते म्हणाले की, लोकसभेला सुद्धा महायुती होती आणि कोणाला उमेदवारी मिळणार किंवा काय या सगळ्या बाबत शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा सुरू होती आणि या लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार हा निवडून येऊ शकतो असा सर्व्हे आल्याने भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाने राणे साहेबांना उमेदवारी दिली आणि अनेक वर्षानंतर या ठिकाणी कमळ फुलले. म्हणून मी आशावादी आहे मला माझ्या पक्षाचे नेत्यांवरती जनतेवरती विश्वास आहे आणि म्हणून रत्नागिरीत पर्याय हवाय बदल हवाय तर समर्थ पर्याय म्हणून आपल्याला बाळ माने हवा का असा प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार घोषित झालेला नाही. पुढील चार दिवसात मला सांगा असा आवाहन मी सगळ्यांना करतो. मी रत्नागिरीचे ग्रामदेवत असलेले श्री भैरीबुवाच्या मंदिरात आशीर्वाद घेण्याकरता जाणार आहे आणि आपणही त्या ठिकाणी येऊन मला आशीर्वाद द्यावेत असेही आवाहन बाळ माने यांनी केले.