राजकीय खळबळ! अद्वय हिरेंवर दादा भुसेंच्या गुंडांकडून हल्ला; जीवे मारण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा गंभीर आरोप

0
57

मालेगाव, दि. 29 (पीसीबी) : राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. अशातच नाशिकच्या मालेगावमधून धक्कादायक बातमी समोर आली. मालेगाव शहरात शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते, मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अद्वय हिरे यांच्यावर हल्ला झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अद्वय हिरे मालेगावातील एका कार्यकर्त्याच्या घरी गेले होते. यावेळी बाहेरून काही गुंडांनी त्यांच्यावर दगडफेक केली. त्यांना धमकावलं, अशी तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. अद्वय हिरेंवर दादा भुसेंच्या गुंडांकडून हल्ला करण्यात आला आहे. ठार मारण्याचा प्रयत्न झाला, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे.

पराभवाच्या भीतीने शिंदे गटाचे लोक अस्वस्थ झालेत. अनेक ठिकाणी आमच्या उमेदवारांना धमक्या दिल्या जात आहेत. पोलिसांकडून दबाव आणला जात आहे. खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. खोटे गुन्हे दाखल केले जात आहे. यात नाशिकचे पोलीस आयुक्त सुद्धा सामील आहेत. काल संध्याकाळी मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे आमचे उमेदवार डॉ. अद्वय हिरे यांच्यावर दादा भुसे यांच्या गुंडांनी हल्ला केला. हिरे प्रचार करत असताना त्यांच्या गाड्यांवर हल्ला केला. त्यांच्याजवळ तलवारी, गावठी पिस्तुल होते. अद्वय हिरे यांना ठार मारण्याच्या दृष्टीनेच हा हल्ला झाला, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

कालच्या हल्ल्यात आमचे पाच शिवसैनिक जखमी झाले आहेत. पोलिसांनी या संदर्भात अजूनही ठोस कारवाई केलेली नाही. हे प्रकरण फक्त मालेगाव बाह्य मतदारसंघापुरतं मर्यादित नाही. असं जर पोलीस यंत्रणेचा वापर करून हल्ले होत असतील. तर यांना महाराष्ट्रात शांततेत निवडणूक होऊ द्यायची नाही हे स्पष्ट होत आहे, असं राऊत म्हणाले.