राजकारणातही नियतीचा फेरा… आर.आर. आबांची एक्झिट आणि…

0
64

मुंबई, दि. 09 (पीसीबी) : राज्यात आता हिवाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी एक अनोखाच प्रसंग घडल्याचं पहायला मिळालं. राजकारणातही नियतीचा फेरा पुन्हा फिरून तिथंच आल्याची एक घटना घडलीय. दशकभरापूर्वीची गोष्ट. 8 डिसेंबर 2014 म्हणजे आजपासून 10 वर्षांपूर्वी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात होणार होती. तासगाव मतदारसंघातून आमदार बनलेले आर आर पाटील यांनी प्रकृती अस्वाथ्यामुळे याच दिवशी विधानसभेच्या रणांगणातून माघारी फिरावं लागलं त्याच दिवशी दहा वर्षांनी जुनियर आर आर पाटील म्हणजेच आमदार रोहित पवार यांनी विधानसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. त्यामुळं आता याला केवळ योगायोग म्हणायचा की नियतीचा खेळ! अशी चर्चा रंगली आहे.

दिवंगत आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी 8 डिसेंबरला विधानसभेत आमदारकीची शपथ घेतली. दहा वर्षांपूर्वी याच दिवशी सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनात प्रकृती अस्वास्थ्यामुळं आर आर पाटील यांनी सभागृहात अनुपस्थित राहता येणार नसल्याचं सांगत तसे पत्र विधानभवनात पाठवले होते. एकप्रकारे विधानसभेच्या रिंगणातनं माघार घ्यावी लागली होती. पण त्याच दिवशी आमदार रोहित पवारांनी विधानसभेच्या आमदारकीची शपथ घेतली आहे.

काय होतं या पत्रात?
‘प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या डॉक्टरांनी सक्तीच्या विश्रांतीचा सला मला दिला आहे. यामुळे मला दि 8 डिसेंबर 2024 पासून नागपूर येथे सुरु होणाऱ्या विधीमंडळ अधिवेशनास सुरुवातीचे काही दिवस उपस्थित राहता येणार नाही, तरी सभागृहात अनुपस्थित राहण्याची अनुमती मिळावी’ असे ते पत्र होते. दरम्यान, 10 वर्षांनी त्याच दिवशी आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी विधानसभेत शपथ घेतली.महाराष्ट्राच्या जनतेला साक्ष ठेवत रोहित पाटील यांनी शपथ घेतली.

विधानसभेत ज्यूनियर आर आर पाटील विजयी
राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाला लागला असून 288 पैकी 237 जागा जिंकत महायुतीने निर्विवाद वर्चस्व निर्माण केलं आहे. तर, केवळ 49 जागांवर महाविकास आघाडीला यश मिळालं आहे. या 49 जागांपैकी शरद पवारांच्या (sharad pawar) राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जागा जिंकता आल्या असून तासगाव-कवठेमहंकाळ मतदारसंघातून माजी मंत्री आर.आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील (Rohit Patil) विजयी झाले आहेत. राज्याचं लक्ष लागून असलेल्या तासगाव विधानसभा मतदारसंघात रोहित पाटलांनी 26,577 मतांनी विजय मिळवला, त्यांना 1,26,478 मतं मिळाली तर भाजप उमेदवार संजयकाका पाटील यांना 99,901 मतं मिळाली.

पक्षाकडून महत्वाची जबाबदारी
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं हिवाळी अधिवेशनापूर्वीच एक मोठा निर्णय घेतला. आर आर पाटील यांचे पुत्र आमदार रोहित पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवत त्यांची पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी x माध्यमावर याबाबत माहिती दिली.