रहाटणी पिंपळे सौदागर मधील पाणी समस्या लवकरच सुटणार

0
292

पिंपळे सौदागर, दि. ४ (पीसीबी) – रहाटणी पिंपळे सौदागर मधील पाणी समस्या लवकरच सुटणार नगरसवेक नाना काटे व शितलताई काटे यांना प्रयत्नानां यश आज मध्यरात्री नविन पाण्याची टाकी वॅाश आऊट करण्याचा कामास सुरूवात करण्यात येणार आहे.

आज दि. ३ एप्रिल २०२३ रोजी रहाटणी पिपंळे सौदागर मधील पाणी समस्ये बाबत दि. २३ फेब्रुवारी २०२३ रेजी मा. विरोधी पक्षनेते श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी मा. आयुक्त यांना दिलेल्या पत्रानुसार आज पाणी पुरवठा अधिकारी कार्यकारी अभियंता श्री. अजय सुर्यवंशी , उपअभियंता श्री. दिपक पाटील, श्री. मोरे यांच्या समवेत संयुक्त बैठक घेण्यात आली त्यानुसार काही दिवसापासुन रहाटणी पिंपळे सौदागर मध्ये कमी व अपुरा पाणी पुरवठा केला जात असुन नागरिकानां याचा आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे तसेच रोझलॅन्ड शेजारील पाण्याची टाकी बांधुन पुर्ण झालेली आहे

तसेच या टाकी वरून पाणी पुरवठा करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजुस ३०० एमएम व्यासाची पाईप लाईन टाकलेले आहे परंतु टाकी परिसरात काही किरकोळ काम बाकी असल्याने ती चालु करण्यात आली नाही परंतु ते काम आता पुर्ण झाले असुन या टाकीवरून पाणी पुरवठा केल्यास परिसरातील पाण्याची समस्या मिटेल ही बाब मा. आयुक्त यांच्या निर्दशनास आणुन लवकरात लवकर ही पाण्याची टाकी चालु करावी अशी मागणी नाना काटे यांनी मा. आयुक्त यांना पत्राद्वारे केली होती. त्यानुसार आज मध्यरात्री कुणाल आयकॅान रोड वरील रोझलॅन्ड सोसायटी शेजारील २० लाख लिटर पाण्याची टाकी वॅाश आऊट करण्यात येणार आहे,

व ही प्रक्रीया पुर्ण झाल्यावर लगेचच या टाकीवरून संपुर्ण कुणाल आयकॅान रोडवरील सर्व सोसायटीनां पाणी पुरवठा करण्यात येईल अशी माहीती संबंधीत अधिकारी यांनी नाना काटे यांनी बोलवलेल्या मिटींग मध्ये सांगण्यात आले त्यामुळे रहाटणी पिपंळे सौदागर मधील पाणी प्रश्न मार्गी लागला आहे नगरसवेक नाना काटे व शितलताई काटे यांनी केलेल्या पाठपुराव्याचे व पाण्यचा प्रश्न सोडवल्या बद्दल नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे