रहाटणी, थेरगाव, पिंपळेसौदागर, काळेवाडी, वाकड भागातील पाणीपुरवठा विस्कळीत

0
309

पिंपरी, दि. १३(पीसीबी) – रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील टप्पा 3 व 4 वरील व्हॉल दुरुस्तीसाठी विद्युत विभागाकडून यंत्रणा बंद करण्यात आल्याने रहाटणी, थेरगाव, पिंपळेसौदागर, काळेवाडी, वाकड, पिंपळे निलख परिसरातील पाणीपुरवठा चार तास विस्कळीत झाला आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात नागरिकांचे पाण्याविना हाल झाले.

महापालिका पवना नदीवरील रावेत – पुनावळे दरम्यान असलेल्या बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करते. त्यावर निगडी सेक्टर 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाते. तेथून शहरवासीयांना पाणी पुरवठा केला जातो. रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील टप्पा 3 व 4 वरील व्हॉल दुरुस्ती केली जात आहे. त्यासाठी विद्युत यंत्रणा बंद ठेवली आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. रहाटणी, थेरगाव, पिंपळेसौदागर, काळेवाडी, वाकड, पिंपळे निलख परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

दुरुस्तीचे काम वेगात सुरु आहे. दुपारी दोन ते अडीच वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल. काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. दुरुस्तीचे काम झाल्यानंतर त्या भागाला पाणीपुरवठा केला जाईल, असे महापालिका पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.