रहाटणीत टोळक्याचा हैदोस; एकावर तलवारीने वार

0
516

रहाटणी, दि. ९ (पीसीबी) – ‘तू माझ्या एरियात का येतोस. हा माझा एरिया आहे’ असे म्हणत एका टोळक्याने दोघांना मारहाण केली. एकावर तलवारीने वार केले तर दुस-यावर दांडक्याने मारून जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. ७) रात्री साडेअकरा वाजता रहाटणी येथे घडली.

आदर्श गुंड, शशिकांत बनसोडे, सुनील गाडे आणि त्यांच्या साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुमित दयानंद सोमवंशी (वय ३०, रा. काळेवाडी. मूळ रा. लातूर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र रोहित जालिंदर कारामुंगे (वय १९) मंगळवारी रात्री रहाटणी मधील नखाते वस्ती मधून दुचाकीवरून जात होते. तलवारी, कोयते, लाकडी दांडके हवेत फिरवत आरोपी दुचाकीवरून आले आणि फिर्यादी यांना अडवले. आरोपींनी परिसरात दहशत निर्माण करून आदर्श गुंड याने ‘तू माझ्या एरियात का येतोस. हा माझा एरिया आहे’ असे बोलून जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांच्या डोक्यात वार केला. तो वार चौकावण्यासाठी फिर्यादी यांनी हात मध्ये घातल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली. आरोपींनी फिर्यादीच्या मित्राला लाकडी दांडक्याने डोक्यात मारून जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.