महाराष्ट्र, दि. १७ जुलै (पीसीबी) – झोप येत असल्याने भर रस्त्यात भला मोठा कंटेनर उभा करून चालक झोपी गेला. मात्र मागून येणाऱ्या भरधाव गाडीने कंटेनरला धडक दिली. यात गाडी चालकाचा मृत्यू झाला आहे. हा विचित्र अपघात रविवारी(दि.16) पहाटे मुंबई बेंगलोर महामार्गावर मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर झाला.
याप्रकरणी सतीश नारायण गड्डम (वय 46,राहणार कात्रज) यांनी फिर्याद दिली असून हिंजवडी पोलिसांनी कंटेनर चालक शरणप्पा कुबेरप्पा खोपड (वय 23 राहणार कर्नाटक) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा तुर्भे येथून फिर्यादी यांच्या कंपनीचा कंटेनर घेऊन बंगलोर येथे जात होता. मुंबई-बेंगलोर हायवेवर असताना हॉटेल रांजाई समोर त्याने झोप येत असल्याने कंटेनर रस्त्याच्या मधोमध उभा केला. तेथेच तो झोपी गेला,दरम्यान कंटेनर मागून येणारी गाडी भरधाव वेगाने आली व ती कंटेनरला धडकली. यात गाडी चालक शिवकुमार यादव गंभीर जखमी झाला व त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावरून हिंजवडी पोलीस दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.