रस्त्यात थांबल्याने चालकाचे दोन दात पाडले

0
78

दि. १९ ऑगस्ट (पीसीबी) देहूरोड
रस्त्यात गाडी घेऊन थांबलेल्या चालकाच्या तोंडावर बुक्की मारून दोन दात पाडले. ही घटना एम.बी. कॅम्प, देहूरोड येथे शनिवारी (दि. 17) दुपारी घडली.

विकास रामेर वाल्मिकी (वय 36, रा. मेन बाजार, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजित रामकुमार, वेल्लु कलीमुर्ती चिन्नतंबी (वय 37, रा. एम. बी. कॅम्प, देहूरोड) आणि त्यांचे दोन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास फिर्यादी हे शरण बसप्पा यांच्यासह एम. बी. कॅम्प परिसरात थांबले होते. त्यावेळी तिथे आलेल्या चार आरोपींनी रस्त्यात का गाडी घेऊन थांबला आहेस, असे म्हणत फिर्यादी यांना लाथा बुक्क्या आणि काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच फिर्यादी विकास यांच्या तोंडावर बुक्की मारून दोन दात पाडले. तसेच फिर्यादी यांचा मावस भाऊ चेतन यास मारहाण केली.

याच्या परस्पर विरोधी वेल्लू कलीमुर्ती चिन्नतंबी (रा. देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकास रामेर वाल्मिकी आणि त्यांचा साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी वेल्लू हे रस्त्याने जात असताना त्यांना फिर्यादी यांच्या पुतण्याचे भांडण सुरू असल्याचे दिसून आले. फिर्यादी हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता आरोपी विकास याने शिवीगाळ करीत लाकडी काठीने फिर्यादी यांना मारहाण केली. तर दुस-या आरोपीने फिर्यादी व अजित यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.