कामावरून घरी निघालेल्या महिलेला दोन अनोळखी इसमांनी रस्त्यात अडवले. महिलेचा विश्वास संपादन करून तिचे दागिने काढण्यास सांगत त्या दागिन्यांचा अपहार केला. ही घटना बुधवारी (दि. 24) सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास गवळीनगर भोसरी येथे घडली.
याप्रकरणी 61 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांचे काम संपवून पायी चालत घरी जात होत्या. त्या गवळीनगर येथे आल्या असता त्यांना दोन अनोळखी व्यक्तींनी थांबवले. महिलेचा विश्वास संपादन करून त्यांच्या गळ्यातील दागिने काढून व्यवस्थित ठेवण्याचा बहाणा करत त्याचा अपहार केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.










































