चिखली, दि. 15 (पीसीबी) : सार्वजनिक रस्त्याच्या कडेला पार्क केलेली दुचाकी अवघ्या अर्धा तासात चोरीला गेली. ही घटना शरदनगर, चिखली येथे ६ ऑक्टोबर २०२४ रोजी घडली.
जयविजय लक्ष्मण आत्राम (वय ४५, रा. खंडेवस्ती, भोसरी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आत्राम यांनी आपली २० हजार रुपये किमतीची (एमएच १४ इडब्ल्यू ६७२१) ही दुचाकी ६ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास स्वामी विवेकानंद ब्रीज, शरदनगर जवळ, चिखली येथे पार्क केली होती. दुपारी दीड वाजताच्या सुमारास ते परत आले असता त्यांना आपली दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यांनी आसपासच्या परिसरात दुचाकीचा शोध घेतला. मात्र दुचाकी मिळून न आल्याने रविवारी याबाबत फिर्याद दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.










































