रस्त्याची डागडूजी करणाऱ्या वृद्धास वाहनाने उडवले

0
40

हिंजवडी, दि. 28 (पीसीबी) : रस्त्याची डागडुजी करणाऱ्या वृद्ध व्यक्तीला वाहनाने धडक दिली. यामध्ये वृद्धाचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 26) रात्री दहा वाजताच्या सुमारास बेंगलोर-मुंबई महामार्गावर वाकड मधील करपेनगर येथे घडला.

योगेंद्र जगु पासवान (वय 60) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी संजय श्रीवास्तव पासवान (वय 45, रा. कात्रज, पुणे. मूळ रा. झारखंड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय पासवान आणि त्यांचे चुलते योगेंद्र पासवान हे बेंगलोर-मुंबई महामार्गावर डागडुजीचे काम करत होते. काम करत असताना अज्ञात वाहनाने योगेंद्र पासवान यांना धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी होऊन योगेंद्र पासवान यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर वाहन चालक घटनास्थळी न थांबता तसेच जखमींना रुग्णालयात न नेता पळून गेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत