दि . २३ ( पीसीबी ) – सेक्टर 24,25, निगडी ते दापोडी पाण्याची पाईपलाईन साठी खोदलेला रस्ता चार दिवसांत दुरुस्त करण्याबाबत निवेदन आज स्थापत्य अधिकारी प्रवीण धुमाळ व ऋषिकेश गेंगजे पाणीपुरवठा उपअभियंता ब क्षेत्रीय कार्यालय पिं-चिं मनपा यांना देण्यात आले
निगडी ते दापोडी पाणीपुरवठा विभागामार्फत मोठी पाईपलाईनचे खोदकाम चालू आहे हे काम निगडी प्राधिकरण मधून मुख्य रस्त्यावरून मधोमध चालू आहे, गेल्या एक ते दोन महिन्यापासून सेक्टर 25 कृष्णा हॉटेल ते सेक्टर 24 हॉटेल सावली पर्यंत काम चालू होतं ते आता पूर्ण झालेल असून, आपण या भागातील रस्ता चार दिवसांत दुरुस्त करून द्यावा या भागातील नागरिकांना रस्ता खोदल्यामुळे धुळीचा खूप त्रास होत असून, पाऊस चालू झालेला आहे पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असून वाहने घसरत आहेत व वाहने चालवताना अनेक अडचणी येत आहेत व काही अपघातही झालेले आहेत, रस्त्यांवरून वाहने चालवताना नागरिकांना एका लेन्थ मध्येच आपले वाहन चालवावे लागत आहेत, त्यामुळे रस्त्यांवरती अपघात होत असून वाहन चालवणाऱ्या, ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना खूप त्रास होत आहे व पावसाळाही चालू झालेला आहे.
तरी आपण या विषयाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सेक्टर 24 व 25 या भागातील पाईप लाईन साठी खोदलेला रस्ता चार दिवसांत दुरुस्त करावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढील पाईपलाईन खोदण्याचे काम बंद पाडील व आपल्या ऑफिसमध्ये धरणे आंदोलन करणे याची आपण नोंद घ्यावी.
आपला
बाळा दानवले
उपाध्यक्ष मनसे पिंपरी चिंचवड शहर












































