रस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

0
920

पुनावळे, दि. ०६ (पीसीबी) – रस्ता ओलांडत असताना भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 3) दुपारी तीन वाजताच्या सुमारास पुणे मुंबई महामार्गावर पुनावळे येथे घडली.

भोलाराम बेल तंती (वय 33, रा. ताथवडे. मूळ रा. आसाम) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी बिकी उदय करमकार (वय 23, रा. ताथवडे) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचा मित्र भोलाराम हे पुणे मुंबई महामार्ग हा रस्ता ओलांडत होते. फिर्यादी यांनी रस्ता ओलांडला. मात्र त्यांच्या पाठीमागून त्यांचा मित्र भोलाराम येत असताना त्यांना अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या भोलाराम यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.