रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू

0
201

रस्ता ओलांडत असताना तरुणाचा अपघातात मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि.27) रात्री वाकड येथील बस स्टॉप जवळ घडली आहे.

या प्रकरणे सचिन दिनेश गोस्वामी (वय 26 रा.वाशी नवी मुंबई) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून हिंजवडी पोलिसांनी थार गाडी चालक वेदांत नागेंद्र ( रा. मारुंजी मुळशी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र अंगद शिवयोग्य गिरी (वय 28) हे दोघे बस स्टॉप वर बसले होते. यावेळी अंगद हे लघुशंकेसाठी जात असताना आरोपींनी त्याच्या ताब्यातील गाडी भरता वेगाने चालवत अंगद यांना जोरात दिली. या अपघातात अंगद हे गंभीर जखमी झाले व त्यांचा मृत्यू झाला.