रसिकलाल एम. धारीवाल इन्स्टियूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च यांच्या विद्यमाने आंतरराष्ट्रिय योग दिनानिमित्त योग कार्यशाळेचे आयोजन

0
354

पिंपरी,दि.२१(पीसीबी) – श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित रसिकलाल एम. धारीवाल इन्स्टियूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च या विभागात दिनांक २१ जून २०२३बुधवार रोजी दैनिक सकाळ यंग इन्सपिरेटरर्स नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रिय योग दिना निमित्त एक दिवसीय योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळेचे उद्घाटन कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय वालोदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

सदर कार्यशाळेची प्रस्तावना महाविद्यालयाच्या यिन समन्वयक सहायक प्राध्यापिका सौ. ज्योती चौधरी यांनी केली. योगाचा प्रारंभ कसा व कोणी केला व आजच्या काळात योगाचे फायदे कशा प्रकार होतात या विषयी मार्गदर्शन केले. तसेच योग प्रशिक्षक यांनी ओमकार शब्दाच्या उच्चाराने शरिरातील सर्व प्रकारचे दोष नाहीसे होतात, शरीर रोगमुक्त होते, शरीराची कांती वाढते, उच्च रक्तदाब व रक्तातिल साखरेचे प्रमाण नियंत्रणात कशा प्रकारे राहाते याचे महत्व पटवुन दिले. तसेच योगाचे वेगवेगळे प्रकार जसे की भस्तिका प्राणायम, योगिक जॉगिंग, कपालभाती, प्राणायाम, बाह्य प्राणायाम, अग्निसार क्रिया पोटावरील आसने यांचे प्रात्याक्षिक व होणारे फायदे सांगितले.

सदर कार्यशाळेला महाविद्यालयाच्या विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभागी होऊन भरगोस प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांसाठी च्या या उत्तम उपक्रमासाठी श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. प्रकाशचंदजी रसिकलालजी धारिवाल, चेअरमन मा. श्री शांतिलालजी लुंकड आणि ऑनररी जनरल सेक्रेटरी अँड राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा यांनी अनेक शुभेच्छा दिल्या व विशेष कौतुक केले. या उपक्रमाचे नियोजन कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय वालोदे आणि सहयोगी प्राध्यापिका डॉ. सौ श्वेता घोडे यांच्या मागेदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवी संघटनेचे समन्वयक सहायक प्राध्यपक श्री रघुनाथ राऊत यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहायक प्राध्यापिका सौ. मनिषा खैरे यांनी केले.