दि.०३(पीसीबी) – `रवी या…, तुम्ही आमचेच आहात…आपला डिएनए एकच आहे…आता नवीन जनरेशची गरज आहे… जे काही मागे घड़ले ते विसरून जा, राजकारणात हे असे होत असते…` अशा शब्दांत दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिनविरोध निवड झालेल्या भाजप उमेदवार रवी लांडगे यांचा गौरव केला.
पिंपरी चिंचवड महापालिकेत सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झालेल्या रवी लांडगे यांनी मुंबईला मुख्यमंत्री निवासस्थानी जाऊन फडणवीस यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी भाजपचे आमदार श्रीकांत भारती तसेच युवा कार्यकर्ते शिवराज काटे, गणेश उपस्थित होते.
यावेळी पुन्हा एकदा बिनिविरोध निवड कशी झाली याबद्दल फडणवीस यांनी जाणून घेतले. त्यावर लांडगे यांनी हे केवळ आणि केवळ तुम्ही मला संधी दिल्याने आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने शक्य झाले. स्वर्गीय अंकुशभाऊंच्या विचारांचे अनेक हितचिंतक शहरात असल्याने त्यांचेही सहकार्य लाभले.
लांडगे यांनी आपण मध्यंतरी शहरातील स्थानिक नेतृत्वाने अन्याय केल्याने खूप रागावलो होतो म्हणून पक्ष सोडला होता असे अगदी प्रांजळपण सांगितले. त्यावर बोलताना लांडगे यांनी, मला खूप राग आला होता, तुमच्यामुळे नाही तर काही स्थानिक नेतृत्वामुळे असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी त्यावर राजकारणात असे चालते म्हणत ते विसरून जा असा सल्ला देत अभिनंदन केले आणि पुढच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.









































