रविवार, २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार प्रदान सोहळा

0
229

पिंपरी (दिनांक : २७ मे २०२३) स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४०व्या जयंतीनिमित्त आणि निगडी प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या ४०व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून रविवार, दिनांक २८ मे २०२३ रोजी सायंकाळी ठीक ६:३० वाजता राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समरसता गतिविधी मंडळाचे सदस्य डॉ. रमेश पांडव यांच्या हस्ते मणिपूर राज्यातील पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान या संस्थेला रुपये १०००००/- (रुपये एक लाख फक्त) आणि स्मृतिचिन्ह प्रदान करून राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे; तसेच छत्रपती संभाजीनगर येथील पूर्वांचल विकास प्रकल्प छात्रावास या संस्थेला रुपये ५१०००/- (रुपये एकावन्न हजार फक्त) आणि स्मृतिचिन्ह प्रदान करून राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात येईल.

विनाशुल्क असलेल्या या सोहळ्याचा लाभ सर्व नागरिकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.