रविवारी विशाल हिंदू जनगर्जना मोर्चा

0
123
  • सकल हिंदू समाजातर्फे आयोजन
  • शहरातील हिंदू एकवटणार
    दि.१६ चिंचवड (प्रतिनिधी) – बांगलादेशातील निष्पाप हिंदूंवर होणारे अनन्वित अत्याचार, अमानुष हत्या तसेच हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ व तेथील हिंदूंच्या सुरक्षिततेच्या प्रमुख मागणीसाठी सकल हिंदू समाजातर्फे शहरात विशाल हिंदू जनगर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.१८ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे पुतळा चौक चिंचवड स्टेशन येथून या मोर्चाला सुरुवात होणार असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक पिंपरी येथे मोर्चाचा समारोप होणार आहे.

या मोर्चात शहरातील समस्त हिंदू बांधव, भगिनींनी आणि संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सकल हिंदू समाज पिंपरी चिंचवड तर्फे करण्यात आले आहे. ▪️