रविवारी पिंपरी चिंचवड शहरात विराट हिंदू जनगर्जना मोर्चा

0
447

सकल हिंदू समाजातर्फे आयोजन, सहभागी होण्याचे आवाहन

चिंचवड, दि.१६ (पीसीबी) – गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी सकल हिंदू समाजा तर्फे पिंपरी चिंचवड शहरात विराट हिंदू जनगर्जना मोर्चाचे रविवार दि १८ डिसेंबर २०२२ रोजी आयोजन करण्यात आले आहे.

या विराट हिंदू जनगर्जना मोर्चाची सुरवात सकाळी ९ वा चिंचवड स्टेशन येथील क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारकापासून होणार असून मोर्चा महामार्गाने मार्गस्थ होत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे मोर्चाचा समारोप होणार आहे.

या मोर्चात पिंपरी चिंचवड शहरा सह आळंदी, देहू नगर पालिका तसेच हिंजवडी मधून सकल हिंदू समाज त्यातील अनेक संप्रदाय, संस्था,संघटना मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

या विराट मोर्चात पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक हिंदूंनी सह कुटुंब जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सकल हिंदू समाज समन्वय समिती तर्फे करण्यात आले आहे.