“रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलेले आणि शिकविणारे यांचे गोत्र – कर्मवीर भाऊराव पाटील!” – पद्मश्री गिरीश प्रभुणे

0
407

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – “रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलेले आणि शिकविणारे या सर्वांचे एकच गोत्र म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील!” असे गौरवोद्गार पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी वाफगाव (ता. खेड) येथे शनिवार, दिनांक २३ सप्टेंबर २०२३ रोजी काढले. पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त आयोजित श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालय वाफगाव, तालुका खेड येथील कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे बोलत होते. रयत शिक्षण संस्था, साताराचे जनरल बॉडी सदस्य उदय शिवाजीराव पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच वैज्ञानिक डॉ. अशोक नगरकर, माजी विद्यार्थी ॲड. सतिश गोरडे, वाफगावचे सरपंच राजेंद्र टाकळकर, मुख्याध्यापिका जयश्री आसवले, उपायुक्त सुभाष इंगळे, प्रा. दिगंबर ढोकले, राजेंद्र शिंदे, धनंजय भागवत, सुरेश कराळे आदि मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमापूर्वी, वाफगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा यशवंतराव होळकर विद्यालयाच्या परिसरात मान्यवरांची बैलगाडीमधून उत्साही वातावरणात मिरवणूक काढण्यात आली.

त्यानंतरच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करताना गिरीश प्रभुणे यांनी अनेक दाखले देत भारताच्या गौरवशाली इतिहासाच्या परंपरांचा उल्लेख केला. याप्रसंगी ॲड. सतिश गोरडे यांनी आपल्या शाळेतील आठवणी सांगत असतानाच आपण येथूनच घडलो, असे प्रांजळपणे कबूल केले. वडील नानासाहेब गोरडे सर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्यामुळे या शाळेत अनेक जण घडले असेही त्यांनी सांगितले.

टेमकर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जीवनपट कथन करीत त्यांच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. शाळेतील विद्यार्थिनींची प्रातिनिधिक मनोगते झालीत. ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अशोक नगरकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना विज्ञान विषयात जिज्ञासा निर्माण होईल अशी माहिती दिली. प्रा.दिगंबर ढोकले यांनीही मनोगत व्यक्त केले. कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमाचे पूजन करून कार्यक्रमांची सुरुवात झाली.

रयत शिक्षण संस्थेत शिकलेले आणि समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे अनेक उच्चपदस्थ अधिकारी या गावात आहेत त्या सर्वांना एकत्र करून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि दिशा द्यावी आणि विद्यालयाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यालयाच्या भौतिक सोयी सुविधा विकासासाठी सदैव कटिबद्ध आहोत असे मत रयतच्या जनरल बॉडीचे सदस्य उदयराव पाटील यांनी व्यक्त केले.

शिक्षक केशव टेमकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी सरपंच राजेंद्र टाकळकर, उपसरपंच अशोक मांदळे, स्कुल कमिटी सदस्य बाळासाहेब इंगळे, बाळासाहेब रामाणे, सुभाष इंगळे, अजय भागवत, गोपाळ टाकळकर, सुरेश कराळे,उमेश रामाणे,नंदकुमार सुर्वे, काळुराम लंगोटे, गणेश सुर्वे, इसाक मुलाणी, अमर बोऱ्हाडे, माऊली कराळे, रज्जाकभाई इनामदार, भरत थिटे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालयातील सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

मुख्याध्यापिका जयश्री अासवले यांनी प्रास्ताविक केले विजय कराळे यांनी
सूत्रसंचालन केले; धनंजय भागवत यांनी आभार मानले.