प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होताच बावनकुळे यांची घोषणा

0
292

– आता लोकसभेच्या ४५ आणि विधानसभा २०० जागांचे टार्गेट

मुंबई,दि, १२ (पीसीबी) – गेल्या अनेक दिवसांपासून भाजप प्रदेशाध्यक्षपदावरून सस्पेन्स वाढला होता. मात्र आता राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर राज्यातली राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून गेली आहेत. तसेच पक्षीय समीकरणेही बदलत आहेत. चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे आता भाजप प्रदेशाध्यक्षपद हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आलंय आणि प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा होताच बावनकुळेंनी त्यांचं लोकसभा आणि विधानसभेतलं टार्गेटही सांगून टाकलंय. लोकसभेमध्ये भाजप आणि शिवसेना मिळून ४५ पेक्षा जास्त जागा निवडून आणणारच आणि येथे विधानसभेमध्ये २०० पेक्षा जास्त जागा निवडून आणणार असं धडधडीत विधान केलंय. त्यामुळे आता बावनकुळे यांच्या या विधानांने विरोधकांनाही धडकी भरण्याची शक्यता आहे, बावकुळेंची पहिली प्रतक्रिया म्हणजे विरोधकांना इशाराच आहे.

मोदींपासून फडणवीसांपर्यंत सर्वांचे आभार
प्रदेशाध्यपदी निवड झाल्यानंतर बावनकुळे म्हणाले, मी आज मी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे आपल्या माध्यमातून आभार मानतो. महाराष्ट्राचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय चंद्रकांत दादा पाटील आणि महाराष्ट्राच्या सर्व कार्यकर्त्यांचेही खऱ्या अर्थाने आज आभार मानतो, त्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर ही जबाबदारी दिली आणि या जबाबदारीतनं मला पुढच्या काळामध्ये सर्वांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष हा जो नंबर एक पक्ष आमचा आहे, महाराष्ट्रामध्ये अजून नंबर एक कसा करता येईल, अजून त्याला आपल्या पक्षाला प्रचंड मोठं कसं करता येईल, हे पाहायचं आहे, असे म्हणत त्यांनी सर्व नेत्यांचे आभार मानले आहेत.

विधानसबेत २०० जागा जिंकण्याचं टार्गेट
भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये नंबर एक पक्ष म्हणून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड ताकतीने उभा करण्याची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. गावाच्या अध्यक्ष पासून ते महाराष्ट्र अध्यक्षांपर्यंत माझ्यावर पक्षाच्या नेत्यांनी विश्वास व्यक्त केला, तो विश्वास मी पूर्ण करीन, तसेच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना लोकसभेमध्ये ४५ पेक्षा अधिक जागा जिंकेल आणि महाराष्ट्रात दोनशे विधानसभा निवडून आणेल, अशी प्रतिक्रिया यावे